Skymet Weather Monsoon 2022 : औंदाही वरुणराजा चांगला बरसणार, बळीराजाला सुखावणारं स्कायमेटचं पहिलं भाकीत
भारतातील विश्वासार्ह समजल्या जाणाऱ्या स्कायमेट या हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या कंपनीकडून मान्सूनचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनविषयी अंदाज व्यक्त करताना स्कायमेटने सांगितले आहे की, सुरुवातील मान्सून हा नेहमीप्रमाणेच असणार आहे. त्यानंतर जून ते सप्टेंबरपर्यंत सरासरी 880.6 मिमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबईः भारतातील विश्वासार्ह समजल्या जाणाऱ्या स्कायमेट (Skymet) या हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या कंपनीकडून मान्सूनचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनविषयी अंदाज व्यक्त करताना स्कायमेटने सांगितले आहे की, सुरुवातील मान्सून (Monsoon) हा नेहमीप्रमाणेच असणार आहे. त्यानंतर जून ते सप्टेंबरपर्यंत सरासरी 880.6 मिमी पाऊस (Rain) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कंपनीकडून 2022 या वर्षामधील मान्सूनचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. स्कायमेटला आगामी मान्सून ही प्रारंभी ‘सामान्य’ असण्याची शक्यता आहे. या वर्षी बरसणारा मान्सून हा जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीसाठी सरासरी 880.6 मिमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
स्कायमेटकडून 21 फेब्रुवारी रोजीही मान्सूनचा अंदाज जाहीर केला होता, त्यांच्या या पूर्वीच्या प्राथमिक अंदाजामध्येही मान्सून हा नेहमीसारखाच बरसणार असा अंदाज लावला होता, त्यानंतही त्यांनी तोच आपला अंदाज ठेवला आहे. स्कायमेटचे सीईओ योगेश पाटील यांच्या मते पॅसिफिक महासागरातील नैऋत्य मान्सून ही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे मान्सूनचे वारे बदलण्याचीही शक्यता नाकारता येत नाही असे सांगण्यात आले आहे.
मुसळधार पावसाची शक्यता
मान्सून हा सुरुवातील सामान्य अगदी नेहमीसारखा असला तरी काही काळ गेल्यानंतर अचानक जोरदारपणे पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यानंतरही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. मान्सून जुलैनंतर मान्सूनच्या वातावरणात प्रचंड मोठे बदल होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. यामुळे मासिक पर्दन्यमानात मोठे बदल होणार असल्याचे स्कायमेटकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या राज्यांना पावसाची कमतरता
भौगोलिक परिस्थितीनुसार राजस्थान आणि गुजरातसह नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि ईशान्येकडील त्रिपुरा या राज्यांना संपूर्ण हंगामामध्ये पावसाची कमतरता असणार आहे, त्यामुळे परिस्थिती धोक्याची होऊ शकते असे त्यांनी मत व्यक्त केले आहे. तसेच, केरळ आणि कर्नाटकात जुलै आणि ऑगस्टपासून मान्सूनचे प्रमाण कमी होणार आहे.
महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश, उत्तर भारतातील शेती आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या पावसावर आधारित असणाऱ्या शेतीसारख्या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. तर पहिल्या टप्प्यात उत्तरार्धापेक्षा मान्सून चांगला होईल अशी अपेक्षा आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनची चांगली सुरुवात होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या