राजकीय दबावामुळे पूजा चव्हाण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, तृप्ती देसाईंचा थेट आरोप

त्यावर चौकशी करुन तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली होती," असेही तृप्ती देसाई यांनी सांगितले.  (Trupti Desai Comment On Pooja Chavan Suicide Case)

राजकीय दबावामुळे पूजा चव्हाण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, तृप्ती देसाईंचा थेट आरोप
तृप्ती देसाई पूजा चव्हाण
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 9:44 PM

मुंबई :पूजा चव्हाण यांचं आत्महत्येप्रकरणी अनेक पुरावे बाहेर येत आहेत. तेव्हा सुमोटो अॅक्शन घेणे गरजेचे आहे. मात्र राजकीय दबावामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे,” असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्त्या  तृप्ती देसाई यांनी केला आहे. ‘टीव्ही  9 मराठी’शी संवाद साधताना याबाबतचा आरोप केला. (Trupti Desai Comment On Pooja Chavan Suicide Case)

“पूजा चव्हाण सुरुवातीला आत्महत्या आहे. कालपासून ज्या काही ऑडिओ क्लिप बाहेर येत आहेत, किंवा जे पुरावे समोर येत आहेत ते अत्यंत गंभीर आहे. मागच्यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले होते. आता दुसऱ्या मंत्र्यांवर आरोप होत आहे. राजकीय दबावापायी ही प्रकरणं दाबल्याचा प्रयत्न होत आहे. हे अजिबात व्हायला कामा नये,” अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली.

“यात आत्महत्येला प्रवृत्त केलेल्याचे काही ऑडिओ क्लिप आहेत. त्यांच्या संबंधित मंत्र्यांचा काही हात असेल, तर निश्चितच पुणे पोलिसांनी तात्काळ गंभीर दखल घेऊन चौकशी करावी. जेव्हा असे पुरावे बाहेर येतात, तेव्हा सुमोटो अॅक्शन घेणे गरजेचे आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. गेल्या महिन्यातही एका मंत्र्यावर आरोप झाले होते. मात्र त्यावर काही कारवाई झाली नाही. नंतर करुणा शर्मा यांच्याप्रकरणी कोणतीही कारवाई करत नाही,” असेही तृप्ती देसाई म्हणाल्या.

“यानंतर आता शिवसेनेच्या मंत्र्यांवर असे काही समोर येतं आहे, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेऊन कारवाई करावी. निश्चित याविरोधात आवाज उठवले. पुण्यात आल्यावर मी कमिश्नरची भेट घेईन, त्यावर चौकशी करुन तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली होती,” असेही तृप्ती देसाई यांनी सांगितले.

चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?

पूजा चव्हाण या युवतीची आत्महत्या नसून, हत्याच असल्याचे बरेच अपडेट्स गेल्या दोन दिवसात आपल्यासमोर आले आहेत. त्यामध्ये जवळपास दहा ११ ऑडिओ क्लिप, फोटोज समोर आलं आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर तिचा दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे, असं मंत्री अरुण राठोड नावाच्या माणसाला सांगत आहेत. हे आपण ऐकलं. पोलीस याबाबत काहीच स्पष्टता देत नाहीत. पूजा राठोड हिच्या परिवारावर दबाव असू शकतो. पोलिसांनी सदसदविवेकबुद्धी शाबूत ठेवून, सुमोटो अंतर्गत हा गुन्हा दाखल करायला हवा. या फोटोज, ऑडिओ क्लिप्सना गेले दोन दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या, सोशल मीडियातून येणाऱ्या बातम्या यांचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. यासाठी राजकीय इच्छाशक्ती तितकीच महत्त्वाची आहे.

भाषणांमध्ये महिलांची सुरक्षांबद्दल बोलणं, घोषणा करणं सोपं असतं. पण आता मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगायचं आहे, कसली वाट बघताय? एवढे पुरावे आहेत, फोटो आहेत, ऑडिओ क्लिप आहेत, मुसक्या आवळायचे सोडून, कसली वाट बघताय? ताबडतोब कारवाई करा, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

नेमकं प्रकरणं काय? 

पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत रहात होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधकही आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.  (Trupti Desai Comment On Pooja Chavan Suicide Case)

संबंधित बातम्या : 

पूजा आत्महत्या प्रकरणात मंत्री राठोडांचं नाव येताच राष्ट्रवादी म्हणते, कुणालाही वाचवलं जाणार नाही!

बँक खातं भरलेलं असावं, नाती समृद्ध असावी म्हणाणाऱ्या पूजाने टोकाचं पाऊल का उचललं? बोलक्या इन्स्टाग्राम पोस्टनी चटका लावला!

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.