सोलापुरात 16 पोलिसांना कोरोनाची लागण, जिल्ह्यातील आकडा 250 वर

आतापर्यंत सोलापूरमधील शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील 16 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली (Solapur Police Corona Virus Infected) आहे.

सोलापुरात 16 पोलिसांना कोरोनाची लागण, जिल्ह्यातील आकडा 250 वर
Follow us
| Updated on: May 11, 2020 | 9:03 AM

सोलापूर : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला (Solapur Police Corona Virus Infected) आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी तैनात असलेल्या अनेक पोलिसांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. आतापर्यंत सोलापूरमधील शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील 16 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना (Solapur Police Corona Virus Infected) कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तीची तपासणी केल्यावर त्यात आणखी दोन जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता.

यानंतर त्या दोघांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी केल्यानंतर तब्बल 9 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं. त्यामुळे आतापर्यंत सोलापूरच्या ग्रामीण पोलीस दलातील 13 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत शहर पोलीस आयुक्तालयाच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.

सोलापूर शहरातील बाधित पोलीस कर्मचाऱ्यांचा संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान आतापर्यंत ग्रामीण पोलीस दलातील 13 तर शहर पोलीस आयुक्तालयातील 3 अशा एकूण 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र, नाकाबंदी, विनाकारण रस्त्यावर नागरिक अशा सगळ्यांसाठी 12 मार्चपासून पोलीस रात्रीचा दिवस करत आहेत. नागरिकांनी बाहेर येऊ नये यासाठी कधी कठोर भूमिका घेत कारवाईच सत्र सुरु आहे. तर कित्येकदा नागरिकांना विनंतीही केली जात आहे.

सोलापूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 250 वर पोहोचली आहे. यातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 41 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला (Solapur Police Corona Virus Infected) आहे.

संबंधित बातम्या : 

Corona Updates: महाराष्ट्रात दिवसभरात 1276 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकूण आकडा 22,171 वर

पुणे विभागातील 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.