सोलापूरचं प्रशासन भर पावसात रस्त्यावर, 10 वर गेलेला मृत्यूदर 5.7 टक्क्यांवर
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोलापूरचा मृत्यूदर आता 5.7 टक्क्यांवर आला आहे. Solapur corona death rate decreased
सोलापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोलापूरचा मृत्यूदर आता 5.7 टक्क्यांवर आला आहे. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत सोलापूरचा कोरोना मृत्यूदर सर्वाधिक होता. मात्र जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलीस त्यामुळे प्रशासन यांच्या प्रयत्नाला आता यश येताना दिसत आहे. (Solapur corona death rate decreased)
काही दिवसापूर्वी 10 टक्क्यांवर गेलेला मृत्यूदर आता 5.7 टक्क्यांवर आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. मागील काही दिवसांपासून शहर आणि ग्रामीण भागांमध्ये रॅपिड अँटीजन चाचण्या केल्या जात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यामुळे मदत होत आहे.
आज भर पावसात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी शिवशंकर, महानगरपालिकेचे उपायुक्त पंकज जावळे यांनी भागातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेवक गुरुशांत धुतुरंगावकर यांच्या प्रयत्नातून घेण्यात आलेल्या रॅपिड एजंट एस शिबिराला भेट देऊन समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे भर पावसात सुद्धा नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदवला.
महानगरपालिकेच्या प्रतिबंधित क्षेत्रातील को -मोरबीड लोकांची तपासणी करण्यात येणार असून, यामध्ये पाच ते सात टक्क्यांपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे सहज शक्य होत आहे. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने केलेल्या नियोजनामुळे 24 तासात मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण हे आता पाच टक्क्यांवर आल्याची माहिती, पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.
अलगीकरण केंद्रातील सुविधा वाढविण्यात येणार असून, उद्यापासून अलीगकरण केंद्रातल्या लोकांना गरम पाणी मिळणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली.
(Solapur corona death rate decreased)
संबंधित बातम्या
सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप नाही, सोलापूरशी ऋणानुबंध असल्याने दौरा : शरद पवार
Solapur Corona | कोरोनाबळींवर अंत्यसंस्कार करणारी सोलापूरची जिगरबाज कविता ताई!