Solapur Corona | सोलापुरात मृतांची संख्या 52 वर, कोरोनाबाधितांची संख्या सहाशेच्या दिशेने

सोलापुरात कोरोनाचा कहर वाढतच आहे. सोलापुरातील कोरोनामुळे मृतांची संख्या ही 52 वर पोहोचली असून, कोरोनाधितांची संख्या 590 वर गेली आहे. (Solapur Corona Update)

Solapur Corona | सोलापुरात मृतांची संख्या 52 वर, कोरोनाबाधितांची संख्या सहाशेच्या दिशेने
Follow us
| Updated on: May 25, 2020 | 3:11 PM

सोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. (Solapur Corona Update) आज सकाळच्या प्राप्त अहवालात कोरोनाचे सात रुग्ण आढळले आहेत तर आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सोलापुरातील कोरोनामुळे मृतांची संख्या ही 52 वर पोहोचली असून, कोरोनाधितांची संख्या 590 वर गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 254 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

सोलापुरात कोरोना विषाणू संसर्ग थांबण्याचे नाव घेत नाही. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर कम्युनिटी संसर्गाचा धोका आता वाढू लागला आहे. शहरात यापूर्वी किराणा दुकानदार ,रेशन दुकानदार, डॉक्टर, नर्स, नगरसेवक यांना कोरोनाची बाधा झाली होती. या लोकांच्या संपर्कात असणाऱ्या अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालेले असताना, आता पुन्हा शहरातील मोदीखाना, गंगाननगर, मजरेवाडी येथील किराणा दुकानदार , रेशन दुकानदार ,पीठ गिरणी चालक यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. (Solapur Corona Update)

नगरसेविकेच्या पतीला कोरोना

सोलापुरातील एका नगरसेविकेच्या पतीला कोरोनाची बाधा झाल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे नगरसेविकेसह कुटुंबातील लोकांना सिंहगड येथे क्वारंन्टाईन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे संबंधित नगरसेविकेचे पती गेल्या महिनाभरापासून गरीब गरजू लोकांना अन्न वाटप अन्य दोन नगरसेवकांबरोबर करत होते. तर सब जेलमध्ये एका आरोपीला कोरोनाची लागण झाली आहे.

काही दिवसापूर्वी संबंधित आरोपीला ताप खोकल्याचा त्रास जाणवत होता, त्यामुळे त्याला एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर भवानी पेठ येथील एका मंडप व्यावसायिकाला कोरोनाची बाधा झाली आहे. मोदीखाना परिसरात असणाऱ्या रेशन दुकानदार महिलेला तर गंगानगर येथे पिठाची गिरणी चालवणाऱ्या एका महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे.

दुसरीकडे सोलापुरात कोरोनामुळे दिवसागणिक मृतांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये वृद्धांची संख्या सर्वाधिक असल्याने आता जिल्हा प्रशासनाने वृद्ध लोकांची काळजी घेण्यासाठी कुटुंबप्रमुखांना आवाहन केलं आहे, तर ज्या लोकांची घरात गैरसोय होईल अशा वृद्ध लोकांसाठी प्रशासनाने मंगल कार्यालये ताब्यात घेतली आहेत. तिथे त्यांची सोय करण्यात आली आहे.

दोन खासगी हॉस्पिटल्स ताब्यात

सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता सोलापूर महानगरपालिकेकडून दोन खासगी हॉस्पिटल्स ताब्यात घेण्यात आली असून, या हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार होणार आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता सिव्हिल हॉस्पिटलवर ताण वाढला आहे ,त्यामुळे महानगरपालिकेने यशोधरा हॉस्पिटलमधील 30 तर मार्कंडय रुग्णालयातील 40 बेड ताब्यात घेतले आहेत. शहरातील आणखी काही हॉस्पिटल ताब्यात घेण्यात येणार आहेत.

(Solapur Corona Update)

सोलापूर कोरोना अपडेट

  • शहरातील पूर्वभागात सर्वाधिक 244 रुग्ण असून त्यातील 151 जणांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत
  • सिव्हिल लाईन परिसरात 115 रुग्ण
  • कुमठा नाका 56 रुग्ण
  • नई जिंदगी 20 रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.