पती मुंबईत, पत्नी सोलापुरात, कौटुंबीक न्यायालयाकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घटस्फोट
लॉकडाऊनमुळे पतीला मुंबईवरुन सोलापूर येथे येऊन साक्ष नोंदवणे शक्य नव्हते. त्यामुळे पतीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष ग्राह्य धरुन न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला
सोलापूर : सोलापूर येथील कौटुंबिक न्यायालयाने नुकताच (Solapur Divorce Case) एक घटस्फोट मंजूर केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये पतीची साक्ष व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्यात आली. पती मुंबई येथील आणि पत्नी ही सोलापूर येथील रहिवासी होती. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची साक्ष नोदवण्यात आली (Solapur Divorce Case).
लॉकडाऊनमुळे पतीला मुंबईवरुन सोलापूर येथे येऊन साक्ष नोंदवणे शक्य नव्हते. त्यामुळे पतीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष ग्राह्य धरुन न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला आणि तसे आदेश पारित केले आहेत.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
सोलापूर येथील कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश वाय. जि. देशमुख यांनी अर्ज मंजूर केलेला आहे. पती आणि पत्नीतर्फे कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे खजिनदार अॅड. संदेश सतिश कुलकर्णी यांनी काम पाहिले आहे. यामध्ये तंत्रज्ञान आणि कायद्याचा सुरेख संगम पहिला मिळत आहे. तसेच, लॉकडाऊनमध्ये कोर्टाचा एक सकरात्मक निर्णय म्हणून याकडे पाहिलं जात आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक कामं खोळंबली आहे. व्यवसाय, कंपन्या, प्रशासकीय कामंही ठप्प पडली आहेत. आता हळूहळू सर्व कामं पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. तरीही अनेक शहरांमध्ये अद्यापही अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे आता निरनिराळ्या पद्धतीने नियमांचं उल्लंघन न करता कामं केली जात आहेत. लॉकडाऊनमध्ये सोलापूर न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयाकडे सकारात्मकतेने पाहिलं जात आहे.
वर्ध्यात नवरदेवाला कोरोना, वऱ्हाडी अमरावतीला परतले, क्वारंटाईनसाठी प्रशासनाची वरातhttps://t.co/uTDS3uGImA
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 8, 2020
Solapur Divorce Case
संबंधित बातम्या :
लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना
नवदाम्पत्याकडून कोव्हिड सेंटरला 50 बेड, लग्नाचा अनावश्यक खर्च टाळत रुग्ण सेवेसाठी मदत