मंत्री दत्तात्रय भरणे पीपीई कीट घालून थेट कोविड वार्डात, सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये रुग्णांची विचारपूस
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. Dattatray Bharane visit Civil Hospital
सोलापूर: पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. यावेळी रुग्णांनी सिव्हीलमध्ये मिळत असलेल्या उपचारवरून समाधान व्यक्त केल्याची माहिती माहिती पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. (Solapur Guardian Minister Dattatray Bharane visit Civil Hospital and take review of service provide to corona patients)
अचानक भेट देऊन पाहणी
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मिळत असलेल्या उपचार बाबत आणि स्वच्छतेबाबत अनेक वेळा तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे अचानक भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रुग्णांनी मिळत असलेल्या सेवेबाबत समाधान व्यक्त केल्याची यावेळी शासकीय रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद, डॉ. चिटणीस, डॉ. अग्रवाल इत्यादी देखील सोबत होते.
आज सोलापूरमधील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तिथे मिळत असलेल्या उपचारावरून समाधान व्यक्त केले.सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मिळत असलेल्या उपचारबाबत आणि स्वच्छतेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. १/२@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks pic.twitter.com/LoO1LNMNzm
— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) April 25, 2021
अक्कलकोट येथे आढावा बैठक
दत्तात्रय भरणे यांनी अक्कलकोट येथे कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी कोरोना विषाणूची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसंच लसीकरणाचा आढावात्यांनी घेतला.
दत्तात्रय भरणे दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर
सोलापूरच्या कोरोना स्थितीचा पालकमंत्री दत्तात्रय भरणे आढावा घेत आहेत. शनिवारी त्यांनी बार्शी तालुक्यातील कोरोना विषाणूच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनाचा आढावा घेतला. बार्शीतील शासकीय आणि खासगी रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्याबरोबरच ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश त्यांनी दिले. बार्शी येथे बाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या आहे. मात्र या सर्व रुग्णांना बार्शीत उपचार देता यावेत यासाठी प्रयत्न करायला हवा. बार्शीत होम आयसोलेशन ऐवजी जास्तीत जास्त रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात यावे, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात यावा. त्यासाठीची प्राथमिक तयारी करण्यात यावी, अशा सूचनाही भरणे यांनी दिल्या.
संबंधित बातम्या:
शरद पवार ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी मैदानात, साखर कारखान्यांना निर्मिती करण्याचे आदेश
(Solapur Guardian Minister Dattatray Bharane visit Civil Hospital and take review of service provide to patients)