जिल्हा परिषदांच्या शाळांना नावे ठेवणाऱ्यांना डिसले गुरुजी हेच उत्तर : दत्तात्रय भरणे

जिल्हा परिषदांच्या शाळांना नावे ठेवणाऱ्यांना डिसले गुरुजी हेच उत्तर आहे", असं मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

जिल्हा परिषदांच्या शाळांना नावे ठेवणाऱ्यांना डिसले गुरुजी हेच उत्तर : दत्तात्रय भरणे
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 4:19 PM

सोलापूर : “जिल्हा परिषद शाळेत शिकविणाऱ्या अनेक शिक्षकांची मुले खासगी शाळेत शिकत आहेत. जिल्हा परिषद शाळेची स्तिथी आणि दर्जा दोन्हीही सुधारत आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांना नावे ठेवणाऱ्यांना डिसले गुरुजी हेच उत्तर आहे”, असं सोलापुरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.(Solapur Guirdian Minister Dattatray bharne Appriciate Jilha Parishad teacher ranjitsinh disale from solapur honoured by the global award)

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी घरी जाऊन त्यांचा सहकुटुंब सत्कार केला. यावेळी बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत उपस्थित होते.

“जिल्हा परिषद शाळेतील मुलांची सेवा म्हणजे शिक्षकांनी त्यांच्या आईची सेवा केल्यासारखे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अभिमान असेल तर त्यांनी सुरुवातीला त्यांची मुले जिल्हा परिषद शाळेत घालावीत, जेणेकरून जिल्हा परिषदेच्या शाळांविषयी आत्मीयता निर्माण होईल”, अशा शेलक्या शब्दात दत्तात्रय भरणे यांनी शिक्षकांचे कान टोचले.

“जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून डिसले गुरुजींचा गौरव होणे ही नक्कीच अभिमानास्पद आहे. सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवणारा आपला शिक्षक जागतिक पातळीवर सन्मानित होतो यापेक्षा अभिमानाची दुसरी गोष्ट नाही”, असं सांगत गुरुजींच्या पुढील वाटचालीस भरणे यांनी शुभेच्छा दिल्या.

दत्तात्रय भरणेंकडून डिसले गुरुजींचा सहकुटुंब सत्कार

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी घरी जाऊन त्यांचा सहकुटुंब सत्कार केला. यावेळी आमदार राजाभाऊ राऊत उपस्थित होते.

डिसले गुरुजींना मिळालेला पुरस्कार राज्यासाठी अभिमानास्पद

सोलापूर येथील रणजितसिंह डिसले यांना मिळालेला पुरस्कार हा राज्याला अभिमानास्पद गोष्ट आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डिसले गुरुजींनी सुचविलेल्या नवनवीन उपक्रमापाठीमागे शासन खंबीरपणे उभा राहील. त्यांनी राबविलेलं उपक्रम राज्यात राबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार तसंच डीपीडीसीच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून देऊ, असंही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. त्याचबरोबर लवकरच मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते डिसले गुरुजींचा सत्कार करणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

डिसले गुरुजी ‘ग्लोबल टीचर पुरस्काराने सन्मानित

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टिचर प्राईझ जाहीर झाला असून सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार जाहीर झाला. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांतील 12 हजारहून शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डीसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे.

पुरस्कारातील 50 टक्के रक्कम इतर शिक्षकांना

रणजितसिंह डिसले यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संपूर्ण महाष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी पुरस्कारातील एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम त्यांच्यासोबत नामांकन मिळालेल्या पहिल्या 9 शिक्षकांना देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या 9 शिक्षकांचादेखील सन्मान होणार आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे.

दरम्यान, रणजितसिंह डिसले यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे. तसेच, हा राज्यातील सर्व शिक्षकांचा गौरव असल्याची भावना रणजितसिंह यांनी व्यक्त केली आहे.

(Solapur Guirdian Minister Dattatray bharne Appriciate Jilha Parishad teacher ranjitsinh disale from solapur honoured by the global award)

संबंधित बातम्या

अरे व्वा..! जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची युनेस्कोकडून दखल, तब्बल 7 कोटी रुपयांच्या पुरस्काराने सन्मान

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.