सोलापूर : पुणे सोलापूर महामार्गावर एका मारुती सुझुकी कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिलीय. पुण्याच्या दिशेने ही मारुती सुझुक कार चाललेली असतानाहा अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत विशेष म्हणजे ज्या कारने दुचाकीला धडक दिली त्या कारमधून अवैद्य हातभट्टीच्या दारुची वाहतूक केली जात होती. (Solapur Suzuki car hit bike Two young men injured)
सविस्तर घटना अशी की, सोलापूरवरुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या मारुती सुझुकीने एका दुचाकीस्वराला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवर असलेल्या दोघांना गंभीर मार लागला. अपघाताची तीव्रता एवढी होती की दुचाकी थेट कारच्या खाली आली. एवढा गंभीर अपघात होऊनही कारचालकाने जखमींची विचारपूस करण्याचं औदार्य दाखवलं नाही.
उलट आपल्या गाडीत अवैध हातभट्टीची दारु आहे म्हणून त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. अपघाताची तीव्रता पाहून परिसरातील लोकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नंतर लोकांनीच जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. जखमींवर सध्या डॉक्टर उपचार करत आहेत.
(Solapur Suzuki car hit bike Two young men injured)
पाहा व्हिडीओ :
हे ही वाचा :
Malad Building Collapsed | मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर
Malad Building Collapsed | मालाड इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, 7 गंभीर, पाहा संपूर्ण यादी