Tricolor Rally : इचलकरंजी शहरात 2.5 किलोमीटर तिरंगा रॅली, 7 हजार 500 मीटरच्या कापडापासून ध्वज निर्मिती

याला शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. इचलकरंजी शहरातील हजारो नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

Tricolor Rally : इचलकरंजी शहरात 2.5 किलोमीटर तिरंगा रॅली, 7 हजार 500 मीटरच्या कापडापासून ध्वज निर्मिती
इचलकरंजी शहरात 2.5 किलोमीटर तिरंगा रॅली
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 9:46 PM

कोल्हापूर : इचलकरंजी येथे 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त शहरात अडीच किलोमीटर लांबीच्या ध्वजाची तिरंगा रॅली काढण्यात आली. त्यासाठी सुमारे 7 हजार 500 मीटरच्या कापडापासून तिरंगा ध्वजाची निर्मिती करण्यात आली. आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या तिरंगा रॅलीचा शुभारंभ माजी खासदार ( Former MP) कल्लापण्णा आवाडे यांच्या शुभहस्ते घोरपडे नाट्यगृह चौकातून झाला. दरम्यान, या रॅलीत शहरातील शालेय विद्यार्थ्यांसह विविध संघटना व शहरवासीय सहभागी झाले आहेत. याचबरोबर केसरी ढोल ताशा पथक, धनगरी ढोल पथक राजस्थानी ढोल गुजराथी दांडिया सहभागी झाले होते. ही भव्य तिरंगा रॅली शहरातील नाट्यगृह चौक (Natyagriha Chowk) – झेंडा चौक – गांधी पुतळा – शिवतीर्थ मार्गे शाहू पुतळा या मुख्य मार्गावरून काढण्यात आली.

हजारो नागरिक रॅलीत सहभागी

याला शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. इचलकरंजी शहरातील हजारो नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, DYSP B. B. महामुनी यांच्यासह इतर पदाधिकारी हे देखील तिरंगा रॅलीच्या शुभारंभाला उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

सामूहिक देशभक्तीचे गीत

इचलकरंजी शहरामध्ये 75 वा स्वतंत्र अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी तिरंगा लावून तिरंगाचे स्वप्न सर्व देशाचे पूर्ण झाले आहेत. 75 व्या स्वतंत्र अमृत महोत्सवी शहरातील राजाराम स्टेडियम येथे महानगरपालिकेच्या वतीने महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच शाहू हायस्कूल यांच्या प्राथमिक पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक देशभक्तीचे गीत साजरी केली. यामध्ये सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज गांधीजी सुभाष चंद्र बोस लोकमान्य टिळक भगतसिंग राजगुरू सुखदेव राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषेतील त्यांचे प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. तसेच शहरात असणाऱ्या न्याय संकुलात ही आज ध्वज वंदन जिल्ह्याचे न्यायाधीश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील वकील मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रांत कार्यालयात ही ध्वजवंदन प्रांताधिकारी विकास खरात तहसीलदार शरद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.