Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cow Dung Business : शेणातून आली श्रीमंती, शेतकरी झाला कोट्याधीश

Cow Dung Business : अनेक तरुण आता शेती आणि पुरक उद्योगांकडे वळत आहे. शेतीसह जोडधंदातून ही मोठी कमाई होऊ शकते. सोलापूर जिल्ह्यातील या शेतकऱ्याने ही गोष्ट सिद्ध केली आहे. हा शेतकरी कोट्याधीश झाला आहे.

Cow Dung Business : शेणातून आली श्रीमंती, शेतकरी झाला कोट्याधीश
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 8:50 AM

सोलापूर| 05 ऑगस्ट 2023 : भारत हा आजही कृषी प्रधान देश आहे. याठिकाणीची 80 टक्के लोकसंख्या आजही शेती आणि शेती पुरक उद्योगांवर अवलंबून आहे. कोट्यावधी शेतकरी पशुपालन व्यवसायाशी निगडीत आहेत. त्याच्यावर त्यांची उपजीविका चालते. कोणी दूध विक्रीसाठी (Milk Products) गाय-म्हशींचा गोठा करतात. तर काही जण दूध डेअरी आणि इतर मिठाईच्या व्यवसायात आहेत. दूध,दही, पनीर यांचा मोठा व्यवसाय आहे. दुग्धजन्य उत्पादन विक्रीतून अनेक जण मालामाल झाले आहेत. गायी-म्हशींचे शेण सुद्धा शेतीसाठी पूरक असते. त्याने जमिनीचा पोत सुधारतो. पीक जोमाने येतात. अनेक शेतकरी आता शेण विक्रीचा् पण व्यवसाय करतात. त्याआधारे काहीजण श्रीमंत झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील या शेतकऱ्याने पण दूध आणि शेण विक्रीतून (Cow Dung Business) कोट्यवधींचा बंगला बांधला आहे.

मेहनतीने काढले नाव

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला हा तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पण इमदेवाडी येथील शेतकरी प्रकाश नेमाडे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी मेहनतीने स्वतःचे नाव काढले. दूध आणि गायीच्या शेण विक्रीतून त्यांनी काय होऊ शकते, याची चुणूक शेतकऱ्यांना दाखवली.

हे सुद्धा वाचा

बांधला एक कोटींचा बंगला

प्रकाश नेमाडे यांनी गायीचे दूध आणि शेण विक्री केले. त्यातून शिवारातच त्यांनी एक कोटी रुपयांचा बंगला बांधला. गोधन निवास असे सार्थ नाव त्यांनी या बंगल्याला दिले. नेमाडे यांच्याकडे वारसाने आलेली 4 एकर शेती आहे. पण पाण्याच्या अभावाने त्यांना शेतात मनाजोगे पीक घेता येत नाही. त्यामुळे उपजीविकेसाठी त्यांनी पशूपालन व्यवसाय सुरु केला होता. हा निर्णय सार्थकी लागला.

आज आहेत 150 गायी

पशूपालन सुरु केल्यानंतर त्यांना चांगली कमाई होऊ लागली. त्यांनी दूध विक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यावेळी त्यांच्याकडे केवळ एकच गाय होती. सुरुवातीला ते घरोघरी जाऊन दूध विक्री करत होते. मेहनतीने त्यांनी पशूपालन व्यवसायात मोठा पल्ला गाठला. त्यांनी साम्राज्य उभं केले. आज त्यांच्याकडे 150 गायी आहेत. आता ते स्मार्ट उद्योजक झाले आहेत. दूधासोबतच त्यांनी शेण विक्रीचा पण व्यवसाय सुरु केला आहे.

एक कोटींहून अधिकची कमाई

आश्चर्याची बाब म्हणजे, प्रकाश नेमाडे यांनी गायीच्या शेण विक्रीतूनच कोट्यावधींचा उद्योग उभा केला. सेंद्रिय शेतीवर त्यांचा विश्वास आहे. त्यांनी गोबर गॅस प्लँट पण टाकला आहे. गायीच्या शेणासोबतच ते गॅसची पण विक्री करतात. गाय म्हतारी होऊपर्यत ते तिची सेवा करतात. गायीच्या शेण विक्रीतून त्यांनी आतापर्यंत एक कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.