आधी चिमुकलीवर अत्याचार, त्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव; सोलापुरात चाललंय काय?

| Updated on: Mar 18, 2023 | 8:29 PM

मला दोन मुली आहे. मला त्यांना शिकवण्याची इच्छा आहे. आम्ही कष्ट करतो. पण, माझ्या मुलींना वारंवार त्रास होत होता.

आधी चिमुकलीवर अत्याचार, त्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव; सोलापुरात चाललंय काय?
Follow us on

सोलापूर : पीडित चिमुकलीची आई म्हणाले, मला दोन मुली आहे. मला त्यांना शिकवण्याची इच्छा आहे. आम्ही कष्ट करतो. पण, माझ्या मुलींना वारंवार त्रास होत होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी तक्रार द्यायला गेली. पोलिसांनी हे खरं आहे का याची विचारणा केली. त्यावेळी मी आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांना बोलवण्यास सांगितलं. त्यांना विचारल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल करा. आरोपी काही माझे वैरी नाहीत. पण, मी त्रास सहन केला आहे. माझ्या मुलीनी वार झेललेत. माझी मुलगी घाबरत आली. मुलगी थरथर कापत होती. म्हणाली, आता पोलीस ठाण्यात चल. मला त्यांना शिक्षा द्यायची आहे. मुलीला विचारल्यानंतर त्यांच्या घरी मी माफी मागण्यासाठी गेली. तेव्हा त्यांनी मला दगडाने मारहाण केली. त्यानंतर पोलिसांत गेली. ग्रामीण पोलिसांनी शहर पोलिसांत पाठवलं.

मुलीला झेलावे लागले वार

घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी शहर पोलिसांत नेऊन सोडलं. पोलीस मॅडम आल्या तशाच निघून गेल्या. आम्ही रात्रभर तसंच बसून राहिलो. त्यावेळी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असती तर मुलीला पुन्हा वार झेलावे लागले नसते. जिवघेणा हल्ला झाला नसता. असा आरोप पीडितेच्या आईने केला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी दखल घेतली नाही

एका मुलीवर सुरुवातीला अतिप्रसंग करण्यात आला. त्यानंतर तक्रार का दिली, याचा जाब विचारण्यात आला. त्यावेळी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मुलीच्या बोटांना दुखापत झाली आहे. पोलिसांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.असा आरोप पीडिताच्या कुटुंबीयांनी केला.

रात्रभर तिथं थांबलो

पाच तारखेला साडेनऊच्या सुमारास अत्याचार झाला. त्यानंतर साडेदहा वाजता पोलिसांत गेलो. रात्रभर तिथं थांबलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एफआयआर नोंदवला. दुसऱ्या दिवशी इकडे-तिकडे पाठवलं. बसवून ठेवलं. घरी आल्यानंतर जबाब देण्यासाठी पुन्हा पोलिसांत बोलावलं.

घटना काय घडली?

मुलगी वांगे चिरत बसली होती. तू आमच्यावर केस करते का, असं म्हणून कोयत्याने वार केले. मुलगी विनवणी करत होती. मी केस माघारी घेते म्हणत होती. केस माघारी घ्यावीच लागले,ेे अशी तंबी आरोपी देत होते. तुझ्या आईलाही संपवू, अशी धमकी दिली. मुलगी पळून शेजारणीच्या घरी गेली. तिथून तिनं कोयत्याने वार झाल्याचे फोनवरून सांगितलं.