Pandharpur wari : तरुणाईची ‘भक्ती’ स्टाइल! आकर्षक रंगसंगतीसह डोक्यावर साकारली ज्ञानोबा माऊलींची प्रतिकृती..!

कोरोनाच्या महामारीत दोन वर्ष पंढरपूरची वारी पायी न निघता मोजक्या वारकऱ्यांच्या साथीने निघाली होती. आता दोन वर्षांनंतर धुमधडाक्यात आणि भक्तीमय वातावरणात वारी निघत आहे. तरूण आपली भक्ती अशा अनोख्या मार्गाने दाखवत आहेत.

Pandharpur wari : तरुणाईची 'भक्ती' स्टाइल! आकर्षक रंगसंगतीसह डोक्यावर साकारली ज्ञानोबा माऊलींची प्रतिकृती..!
तरुणानं डोक्यावर कोरली संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिकृतीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 2:28 PM

सोलापूर : पंढरपूर आषाढी वारीचा (Pandharpur wari) उत्साह आता तरुणाईमध्येही दिसून येत आहे. एका तरुणाने आपली हेअरस्टाइलही अशीच हटके बनवली आहे. या तरुणाच्या डोक्यावर (Hairstyle) संत ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिकृती कोरण्यात आली आहे. आषाढीच्या निमित्ताने तरुणाईसुद्धा आपली भक्ती आगळ्यावेगळ्या मार्गाने करीत असल्याचे दिसून येत आहे. हा आषाढी वारीचा सोहळा आता जवळ येवून ठेपला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar maharaj) आणि संत तुकाराम महाराज पालख्या पंढरीकडे प्रस्थान करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंढरीही सजली आहे. 10 जुलै रोजी आषाढीवारीचा सोहळा साजरा होत असून देशभरातील श्री विठ्ठल भक्तांना वारीचे वेध लागले आहेत. कोरोना संकटाच्या आपत्तीनंतर दोन वर्षांनी वारी भरत असल्याने पंढरीत तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. डोक्यावर विविध संतांची प्रतिकृती कोरुण्याचे फॅड वाढले आहे.

प्रतिकृती रंगसंगतीसह…

पंढरपूर येथील गुरू राऊत या तरुणाने आपल्या डोक्यावरील केसांमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिकृती कोरली आहे. पंढरपूरमधील केशकर्तनकार आणि कलाकार तुकाराम चव्हाण यांनी ही कलाकुसर केली असून यावर्षी तरुणाईत विविध संतांच्या प्रतिकृती कोरण्याची फॅशन वाढीस लागत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. समोर संत ज्ञानेश्वर महाराजांचे चित्र ठेवून हुबेहुब प्रतिकृती तुकाराम चव्हाण यांनी साकारली आहे. केवळ प्रतिकृतीच कोरली नाही, तर रंगसंगतीदेखील केलेली पाहायला मिळत आहे. तर दरवर्षी अशाप्रकारे संतांच्या प्रतिकृती आपल्या डोक्यावर कोरण्यासाठी तरूण गर्दी करत असल्याचे तुकाराम चव्हाण यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

पंढरीत उत्साह शिगेला

कोरोनाच्या महामारीत दोन वर्ष पंढरपूरची वारी पायी न निघता मोजक्या वारकऱ्यांच्या साथीने निघाली होती. आता दोन वर्षांनंतर धुमधडाक्यात आणि भक्तीमय वातावरणात वारी निघत आहे. इकडे देहू आळंदीतर तर उत्साह आहेच, मात्र पंढरपुरात देखील उत्साह आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. तरूण आपली भक्ती अशा अनोख्या मार्गाने दाखवत आहेत. आता संतांच्या प्रतिकृती डोक्यावर कोरून त्यांच्या विचारांवर चालण्याचा वसाच जणू या तरुणांनी घेतला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.