Solapur Crime : सोलापुरात कुर्डूवाडी पोलिस ठाण्यातून आरोपीचे पलायन; टॉयलेटचा बहाणा करुन पोलिसांच्या हातावर तुरी

कुर्डूवाडी पोलिसांत 408 कलमानुसार आरोपी राहुल ज्ञानेश्वर माळीवर गुन्हा दाखल झाला होता. गुरुवारी दुपारी कुर्डूवाडी पोलिसांनी आरोपीस अटक करुन ताब्यात घेतले होते. दरम्यान काही वेळातच त्याला रिमांडसाठी माढा न्यायालयात नेण्यात होते. त्यानंतर उप कारागृहात त्याची रवानगी करण्यात येणार होती.

Solapur Crime : सोलापुरात कुर्डूवाडी पोलिस ठाण्यातून आरोपीचे पलायन; टॉयलेटचा बहाणा करुन पोलिसांच्या हातावर तुरी
सोलापुरात कुर्डूवाडी पोलिस ठाण्यातून आरोपीचे पलायनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 6:02 PM

माढा : टॉयलेटचा बहाणा करुन एका आरोपी (Accused) कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातून पळून (Escapes) गेल्याची घटना सोलापुरमध्ये माढा तालुक्यात घडली आहे. विशेष म्हणजे हातात बेड्या असतानाही तो पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. राहुल ज्ञानेश्वर माळी असे या पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. कुर्डूवाडी पोलिस (Kurduwadi Police) ठाण्यात दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. टॉयलेटचा बहाणा करुन पोलीस ठाण्यातील टॉयलेटच्या कठड्यावरून उडी मारुन आरोपी पळून गेला. हातात बेड्या असतानाही आरोपी चक्क पोलीस ठाण्यातूनच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्याने कुर्डूवाडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रिमांडला नेण्याआधीच आरोपीचे पलायन

कुर्डूवाडी पोलिसांत 408 कलमानुसार आरोपी राहुल ज्ञानेश्वर माळीवर गुन्हा दाखल झाला होता. गुरुवारी दुपारी कुर्डूवाडी पोलिसांनी आरोपीस अटक करुन ताब्यात घेतले होते. दरम्यान काही वेळातच त्याला रिमांडसाठी माढा न्यायालयात नेण्यात होते. त्यानंतर उप कारागृहात त्याची रवानगी करण्यात येणार होती. मात्र रिमांडला उभा करायच्या अगोदरच हातात बेड्या असतानाही आरोपी संबंधित हवालदाराला टॉयलेटचा बहाणा सांगितला. टॉयलेटला जायचा बहाणा करुन कठड्यावरुन उडी मारुन पळून गेला. पोलीस ठाण्यातूनच पळून गेला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. आरोपी संदर्भात किती निष्काळजीपणाने पोलीस वागतात, याचे उत्तम उदाहरण कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातील घटनेवरुन स्पष्ट झाले आहे. (Accused escapes from Kurduwadi police station under the pretext of toilet in Solapur)

हे सुद्धा वाचा

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.