Ambedkar Jayanti 2022 : जयंतीला डॉल्बी लावण्यावर आंबेडकरवादी कार्यकर्ते ठाम, ध्वनी प्रदुषणामुळे सोलापूर पोलिसांचा नकार
दोन वर्ष कोरोनाचा (Corona) संसर्ग अधिक असल्याने आंबेडकर जयंती (Ambedkar Jayanti 2022) उत्साहात साजरी केली नव्हती. कोरोनाच्या काळात महाराष्ट्र राज्य सरकारकडून लावण्यात आलेले सगळे निर्बंध उठवण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे.
सोलापूर – दोन वर्ष कोरोनाचा (Corona) संसर्ग अधिक असल्याने आंबेडकर जयंती (Ambedkar Jayanti 2022) उत्साहात साजरी केली नव्हती. कोरोनाच्या काळात महाराष्ट्र राज्य सरकारकडून लावण्यात आलेले सगळे निर्बंध उठवण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पण सोलापूरात बाबासाहेबांच्या जयंतीला उत्सवाला डॉल्बी लावण्यास मनाई केली आहे. त्यामुळे बुधवारी सोलापूरात आंबेडकर प्रेमींनी रास्ता रोको आणि धरणे आंदोलन केले. जयंतीच्या आदल्या दिवशी सोलापूरात तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळाली. सोलापूर पोलिसांनी (Solapur Police) ध्वनी प्रदुषणाचा मुद्दा पुढे करीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉल्बी लावण्यास मनाई केली आहे.
डॉल्बी लावण्यावर आंबेडकरवादी कार्यकर्ते ठाम
आज 16 बेस डॉल्बी लावण्यावर आंबेडकरवादी कार्यकर्ते ठाम होते. त्यामुळे त्यांच्यावरती पोलिसांची करडी नजर असेल. डॉल्बीला परवानगी नाकारल्याने बुधवारी सोलापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तर पार्क चौकात अचानक रास्ता रोको करण्यात आला.
कायद्याने बंदी असलेल्या डॉल्बीला परवानगी देता येणार नाही
सर्व नियम बाबासाहेबांनी बनवलेले आहेत. सगळ्यांना घटना मान्य आहे. जिल्हा, उच्च आणि सर्वोच्च न्यायालये बाबासाहेबांच्या घटनेने निर्माण केली आहेत.सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. कायद्याने बंदी असलेल्या डॉल्बीला परवानगी देता येणार नाही असं पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी सांगितलं आहे.