शेवटी पांडुरंगालाच काळजी! पंढरपूरच्या वारीमध्ये स्वयंपाक सुरू असताना सिलेंडरचा पेट, त्यानंतर… नेमकं काय घडलं?
पंढपूरच्या दिशेने पायी चाललेल्या वारीची जगभरात चर्चा होत आहे. विठ्ठलभक्त आपल्या देवाचा गजर करत चालले असताना एक धक्कादायक घटना सोडली. नेमकी काय आहे ती घटना जाणून घ्या.
विठ्ठलाच्या नामाचा गजर करत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेन चालले आहेत. वारकऱ्यांनी आपल्या विठुरायाचं नाव घेत संपूर्ण वातावरण भक्तीमय केलंय. ऊन, पाऊसाचा विचार न करता अगदी वयाची 75 गाठलेला वृद्धही मोठ्या उत्साहाने वारीमध्ये सहभागी झालेला दिसतो. आपल्या देवाचं नामस्मरण करताना स्वत:ला काय होईल याची पर्वा न करता टाळकरी, वारकरी आणि सगळेच भक्त पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत राहतात. त्यामुळे या वारकऱ्यांवर एखादे संकट आले तरी देवसुद्धा त्यांच्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही. अशातच एक अशी घटना घडली ज्यामुळे मोठा अनर्थ टळता टळता राहिला.
नेमकं काय घडलं?
पालखी पुण्यातून सासवडला आणि आता जेजुरीच्या दिशेने जात आहे . आज सकाळी पालखी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गस्थ होणार होती. मात्र दहा वाजता एक अशी घटना घडली ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे. जर वेळीच ते लोक पोहोचले नसते तर मोठा अनर्थ घडला असता, वारी सुरू असताना असं झाली तरी काय ते जाणून घ्या.
दिंडी क्रमांक 78 मधील वारकऱ्यांचा स्वयंपाक सुकी होता. वारकऱ्यांनी जाताना आपल्या दिंडीतील स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडर आणले होते. पण सताना अचानक घरगुती सिलेंडरने पेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली. वारकरी घाबरले कारण सिलेंडरची आग काही प्रमाणात वाढत होती. काही वारकऱ्यांनी हिंमत दाखवत त्यावर वाळू फेकत ती आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग पूर्णपणे विझली नाही. त्यानंतर या आगीबद्दल वाऱ्याच्या वेगाने आग्निशमन दलाच्या जवानांना ही माहिती समजली.
दरम्यान. पालखीमध्ये बंदोबस्तावर असलेले जवान तातडीने घटनास्थळी पोहोचल. पेटलेल्या सिलेंडरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टाळला.