सोलापूर : एक नव्हे दोन नव्हे पठ्ठ्याने चोरल्या तब्बल 233 सायकल, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

सोलापुरात सध्या सायकल चोरांचा सुळसुळात झाला आहे. सदरबाजार पोलिसांनी याप्रकरणात एकाला अटक केली असून, त्याच्याकडून 23 सायकलींसह चोरीचे काही मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. सनी मल्लू पुजारी असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. त्याने विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तब्बल 233 सायकल चोरल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

सोलापूर : एक नव्हे दोन नव्हे पठ्ठ्याने चोरल्या तब्बल 233 सायकल, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 10:18 PM

सोलापूर : सोलापुरात सध्या सायकल चोरांचा (Bicycle thieves) सुळसुळात झाला आहे. सदरबाजार पोलिसांनी (Sadarbazar police) याप्रकरणात एकाला अटक केली असून, त्याच्याकडून 23 सायकलींसह चोरीचे काही मोबाईल (Mobile) हस्तगत करण्यात आले आहेत. सनी मल्लू पुजारी असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. त्याने विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तब्बल 233 सायकली चोरल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्याने आतापर्यंत 1 लाख 47 हजार रुपये किंमतीच्या सायकली चोरी केल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून यापैकी 23 सायकली जप्त केल्या असून, त्यापैकी तीन सायकलींच्या मुळ मालकांचा शोध लागला असून, उर्वरित सायकलींच्या मालकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, यामध्ये आणखी काही आरोपी सहभागी आहेत का? याचा शोध घेत असल्याचेही पोलिसांनी यावेळी सांगितले.

सायकल चोरींच्या घटनांमध्ये वाढ

शहरात सध्या सायकल प्रेमींची संख्या वाढत आहे. पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे वाहन चालवणे परवडत नाहीत. दुसरं महत्त्वाचे कारण  म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचे झाल्यास सायकलचा वापर केल्यास व्यायाम देखील होतो. त्यामुळे नागरिकांचा सायक खरेदीचा कल वाढला आहे. सायकलची मोठ्याप्रणात विक्री होत असल्याने सायकलीच्या किमतींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायकलींच्या किमती वाढल्याने तसेच चोरण्यासाठी सोप्या असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा आता सायकलकडे वळवला आहे. सोलापूरध्ये सायकल चोरींच्या घटनांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. तशा अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून 23 सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

असा सापडला पोलिसांच्या तावडीत

सोलापूर शहरात सायकल चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत होते.  याचदरम्यान  एक जण चोरीची सायक विक्रिसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना सापळा रचून सनी पुजारी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या 23 सायकलींसह काही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 233 सायकल चोरल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. यातील तीन सायकलिंच्या मूळ मालकांचा शोध घेतला असून, उर्वरित सायकलींच्या मालकांचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

Vasai Crime : एकमुखी रुद्राक्ष, राजकीय व आर्थिक प्रगतीचे आमिष; 12 लाखाचा गंडा, वाचा नेमके प्रकरण काय ?

पनवेलमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, सहा मुलींची सुटका, दोन आरोपींना अटक

दरोड्याच्या उद्देशाने घरावर आठ ते दहा जणांचा हल्ला; फायरिंगही केली, घटना सीसीटीव्हीत कैद

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.