Dattatraya Bharne | माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा एकदा मोठा धक्का; पाटील यांचा कट्टर आक्रमक नेता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फोडला
गेले अनेक दिवस भाजपवासी असणारे युवा नेते दिपक जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर होते. मध्यंतरी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा समझोता काढण्याचा प्रयत्न केलाचे सांगितले जाते. त्यानंतर दिपक जाधव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पडदा पडला होता.
इंदापूर – गेल्या काही दिवसांपासून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Minister of State Dattatraya Bharne) हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Former Minister Harshvardhan Patil) यांचे खंदे समर्थक फोडत असल्याचं चित्र आहे. आज पुन्हा भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का दिला आहे. हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक युवा ,आक्रमक नेता दीपक जाधव यांना पुन्हा राष्ट्रवादीत आणण्यात भरणे यशस्वी झाले आहेत. दीपक जाधव यांच्या राष्ट्रवादी प्रवेश तारीख निश्चित झाल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे. येत्या तीन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले,सभापती स्वाती शेंडे तसेच इतरही मान्यवरांचा प्रवेश होणार आहे, त्यामध्ये आता आणखी एका प्रवेशाचे भर पडणार असून इंदापूर तालुक्यातील युवा नेते व पूर्वीचे राष्ट्रवादीचे दीपक जाधव (NCP’s Deepak Jadhav)हे पुन्हा स्वगृही परतणार आहेत.
हर्षवर्धन पाटील यांना भरणे यांचा चौथा धक्का
गेले अनेक दिवस भाजपवासी असणारे युवा नेते दिपक जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर होते. मध्यंतरी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा समझोता काढण्याचा प्रयत्न केलाचे सांगितले जाते. त्यानंतर दिपक जाधव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पडदा पडला होता. मात्र गुरूवारी दि.31 मार्च रोजी भाजपात असणारे दिपक जाधव थेट राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हातात हात घालून एकाच गाडीत प्रवास केला. भरणे यांच्या सोबत कार्यक्रमांना उपस्थिती लावली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना हा भरणे यांनी दिलेला चौथा धक्का असून येत्या दोन दिवसात अजूनही प्रवेश होणार असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात रंगत आहे एकंदरीतच भरणे आणि भाजपला मोठा सुरुंग लावला आहे..
कोण आहेत दिपक जाधव?
दीपक जाधव यांनी 2006 – 07 साली इंदापूरच्या सक्रिय राजकारणात प्रवेश केला. दोन वर्षे इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवकाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. याच काळात तालुक्यात पक्ष संघटना वाढचण्याचे काम. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी सोडून हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2010 साली पुन्हा एकदा तालुका युवक काँग्रेस पदाची सूत्रे त्यांच्या हाती आली. यानंतर दिपक जाधव यांची हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक व युवा आक्रमक नेता म्हणून तालुकयासह राज्यात ओळख निर्माण. 2009 सालापासून त्यांनी इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नं. 1 वरती आपली एकहाती पकड ठेवलेली आहे. गेली 15 वर्षे ग्रामपंचायतीवर आपला एकहाती झेंडा फडकवण्यात त्यांना यश आले आहे. 2017 साली पळसदेव बिजवडी घटातून त्यांनी पुणे जिल्हा परिषद ही लढविली होती मात्र अवघ्या काही मताधिक्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ते इच्छुक उमेदवार आहेत.
Akola Temperature | अकोल्यामध्ये उष्माघाताचा बळी, शेतातून काम करून परत असताना शेतकऱ्याचा मृत्यू
Banana : अवकाळीतून सुटका आता वाढत्या ऊन्हाच्या झळा, केळी उत्पादकांसाठी ‘बुरे दिन’