Indapur | इंदापूर तालुक्यात ‘भाजप’ ला खिंडार ; हर्षवर्धन पाटलांचे कट्टर समर्थक करणार राष्ट्रवादीत प्रवेश, 3 एप्रिलला होणार पक्ष प्रवेश
हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थकांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार आहे मात्र भरणे यांनी फक्त श्रीमंत ढोले यांचेच नाव उघड केले आहे, ढोले यांच्याबरोबरही अजूनही मोठे पक्षप्रवेश होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे, मात्र विरोधकांना जरा मोठा झटका बसावा यामुळे आता मी काही पत्ते ओपन करणार नाही असेही भरणे यांनी सांगितले.
इंदापूर – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Minister of State Dattatraya bharne) हे सध्या ॲक्शन मूडमध्ये असल्याचं दिसून येत आहे. भरणे हे इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Former Minister Harshvardhan Patil)यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का देणार आहेत. पाटील यांचे होम ग्राउंड असलेल्या इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी-बावडा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य श्रीमंत ढोले (सर) (Shrimant Dhole )यांना राष्ट्रवादीत आणण्यात यशस्वी झाले आहेत. स्वतः भरणेणी याविषयी भर सभेत माहिती दिली आहे. ढोले यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. एप्रिल महिन्याच्या तीन तारखेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी या ठिकाणी ढोले सरांचा व त्यांच्या समर्थकांचा प्रवेश होणार आहे. भरणे यांनी केलेल्या या कामगिरीमुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे स्वतः इंदापूरला येत मोठी जंगी सभा घेणार आहे. यावेळी शेतकरी मेळावा देखील ठेवण्यात आला आहे,त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राज्यमंत्री भरणे यांनी भाजपला खिंडार पाडण्याचे यावरून ठरवले असल्याचे दिसून येत आहे.
पाटलांच्या समर्थकांचा भाजपाला रामराम
याच कार्यक्रमात अजून हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थकांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार आहे मात्र भरणे यांनी फक्त श्रीमंत ढोले यांचेच नाव उघड केले आहे, ढोले यांच्याबरोबरही अजूनही मोठे पक्षप्रवेश होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे, मात्र विरोधकांना जरा मोठा झटका बसावा यामुळे आता मी काही पत्ते ओपन करणार नाही असेही भरणे यांनी सांगितले. भरणे यांनी यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांना राष्ट्रवादीत आणून धक्का दिला होता. त्यानंतर पाटील यांना बालेकिल्ल्यात बसणारा हा दुसरा मोठा धक्का आहे.
कोण आहेत श्रीमंत ढोले सर
श्रीमंत पोपट ढोले हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक आहेत, सण 2012 ते 2017 या कालावधीसाठी काँग्रेस पक्षाकडून बावडा-लाखेवाडी गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते, तत्पूर्वी ते हर्षवर्धन पाटील यांच्या शिवाजी विद्यालय बावडा, ता इंदापूर,जि पुणे या ठिकाणी शिक्षक म्हणून नोकरीस होते, सण 2018 साली त्यांनी जय भवानी विकास प्रतिष्ठान ही शैक्षणिक संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल सीबीएससी, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, जय भवानी विकास प्रतिष्ठान अकॅडमी (NEET,MHT-CET) इत्यादी प्रकारचे शिक्षण दिले जात आहे. सध्या बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील- ठाकरे या आहेत. सदर जिल्हा परिषद गटातून आगामी काळात श्रीमंत पोपट ढोले यांच्या पत्नी चित्रलेखा श्रीमंत ढोले या इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.