VIDEO | मुख्यमंत्री देवेंद्र… दत्तामामा पुन्हा अडखळले, टेंशनमध्ये असतो माणूस, भरणेंकडून पांघरुण

मुख्यमंत्री म्हणून अजूनही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना उद्धव ठाकरे रुजेनात की काय? असेच भरणे यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे, यापूर्वीही काही दिवसांपूर्वी इंदापूरमधील भरसभेत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केल्यानंतर काल इंदापूर येथील शहा या गावी भर सभेत राज्यमंत्री भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र अशे म्हणताच तात्काळ आपल्या भाषणात बदल करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा उल्लेख करीत ठाकरेंच्या विषयी मुक्त कंठाने प्रशंसा केली.

VIDEO | मुख्यमंत्री देवेंद्र... दत्तामामा पुन्हा अडखळले, टेंशनमध्ये असतो माणूस, भरणेंकडून पांघरुण
Dattatraya BharneImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 2:02 PM

इंदापूर- अनेकदा भर सभेत बोलत असताना वेळेचे भान प्रसंगावधान राखणे गरजेचे असते,या अन्यथानामुष्कीचा प्रसंग ओढवला जातो. असाच काहीसा प्रसंग सोलापूरचे (Solapur)जिल्हा पालक मंत्री व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Minister of State Dattatraya Bharne) मामा यांच्याबाबत घडला आहे. इंदापूर येथे भर सभेत बोलताना भरणे मामा हे मुख्यमंत्र्यांचे नाव विसरले, होते. बोलताना त्यांनी चुकून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)ऐवजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अर्धवट नाव घेतले. मात्र प्रसंगावधान राखता त्यांनी लगेच आपल्या चुकीची दुरुस्ती करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचे पुन्हा नाव घेत त्यांचे मुक्तपणे कौतुक करत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळत वेळ मारून नेली. यापूर्वी ही सभेत बोलताना भरणे मामा यांच्या नावाचा विसर पडला होता. टेंन्शनमध्ये असतो माणूस असे म्हणत चुकीवर पांघरूण त्यांनी घातले.

उद्धव ठाकरे रुजेनात की काय?

मुख्यमंत्री म्हणून अजूनही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना उद्धव ठाकरे रुजेनात की काय? असेच भरणे यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे, यापूर्वीही काही दिवसांपूर्वी इंदापूरमधील भरसभेत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केल्यानंतर काल इंदापूर येथील शहा या गावी भर सभेत राज्यमंत्री भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र अशे म्हणताच तात्काळ आपल्या भाषणात बदल करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा उल्लेख करीत ठाकरेंच्या विषयी मुक्त कंठाने प्रशंसा केली.. त्यामुळे अजूनही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मनातील “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस” च आहेत की असा प्रश्न निर्माण होतो.

चुकता चुकता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे झाले दुरुस्त राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील शहा गावात १२ कोटी १५ लाख निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.. यावेळी सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र एवढे म्हणताच त्यांना त्यांची चूक समजली, व तात्काळ त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख केला, त्यामुळे चुकता चुकता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे दुरुस्त झाल्याचं यावेळी उपस्थितांना दिसून आले. राज्यमंत्री भरणे या अगोदर 14 फेब्रुवारी रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भरणेना चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडलेला दिसून आला होता, यावेळी भरणे यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केल्याने एकच खळबळ उडाली होती, नंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी त्यांची चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख करत चूक दुरुस्त केली.  काल ही इंदापूर तालुक्यातील शहा या गावी अशीच भरणे यांच्या कडून चूक होणार होती, मुख्यमंत्री देवेंद्र.. असा उल्लेख करताच त्यांना त्यांची चूक कळली व लगेच त्यानी ती दुरुस्त केली. मात्र भरणे एवढी मोठी चूक का करत आहेत याचाच प्रश्न इंदापूर सह अख्या महाराष्ट्राला पडला आहे.

VIDEO : नेत्याच्या गाडीवर चप्पल फेकणं महाराष्ट्राची संस्कृती नाही : Rohit Pawar

महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिकांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

Kid shocking video : जिराफाला खाऊ घालायला जातो चिमुरडा आणि होतं असं काही, की आई-वडिलांना फुटतो घाम!

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.