Sharad Pawar | ‘शरद पवार यांनी असं….’, काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा महत्त्वाच वक्तव्य
Sharad Pawar | सध्या शरद पवार यांच्याबद्दल 'इंडिया'मध्येच संभ्रम आहे. "भाजपाचे नेते जरी, काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक असले, तरी मात्र त्यांना पक्षात घेतले जाईल की नाही ? हे सांगता येत नाही" असं हा काँग्रेस नेता म्हणाला.
सोलापूर : काँग्रेसकडून सध्या महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक सुरु आहे. काल सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. पुण्याची लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे. आज हुसेन दलवाई सोलापूरच्या माढ्यामध्ये बैठकीसाठी आले आहेत. सध्या माढ्यामधून रणजीतसिंह नाईक-निंबाळकर खासदार आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार येथे दुसऱ्या स्थानावर होता. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचा माढा लोकसभा मतदारसंघात आढावा दौरा सुरु आहे.
यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना हुसेन दलवाई म्हणाले की, काँग्रेस फुटणार नाही. उलट भाजपाचे अनेक नेते संपर्कात आहेत .शरद पवार यांनी गुपचूप भेटणे सोडून द्यावे, असे ते म्हणाले.
शरद पवार यांच्याबद्दल काय म्हणाले?
शरद पवार हे मोठे नेते आहेत. मात्र, त्यांनी असे गुपचूप भेटणं सोडून द्यावे. यामुळे शंका निर्माण होत आहे. जनतेत देखील संभ्रम होऊ लागलाय. जे गेलेत त्यांना जाऊद्या ना. तुम्ही का भेटताय? असं हुसेन दलवाई म्हणाले.
हुसेन दलवाईंनी काय दावा केला?
2024 ला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी लोकसभेत बहुमत मिळवणार असा विश्वास हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 ला दिसणार नाहीत. भाजपातच फूट पडेल. राहुल गांधी यांना जनता स्वीकारणार” असा दावा त्यांनी केला.
भाजपाकडून कोण संपर्कात?
काँग्रेस पक्ष कधीही फुटणार नाही. भाजपची मंडळी, काँग्रेस फुटणार अशी नेहमी चर्चा करतात. मात्र अनेक मतदार संघात भाजपच्या जुन्या आमदार खासदारांना तिकीट मिळेल का नाही सांगता येत नाही, असे भाजपाचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत असा दावा हुसेन दलवाई यांनी केला. अशा भाजपा नेत्यांना घेणार की नाही?
“भाजपाचे नेते जरी, काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक असले, तरी मात्र त्यांना पक्षात घेतले जाईल की नाही ? हे सांगता येत नाही. कारण राहुल गांधी यांच्या भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊ नका अशा सूचना आहेत, तेच ठरवतील भाजपाच्या नेत्यांना पक्षात प्रवेश द्यायचा का ?” असा हुसेन दलवाई म्हणाले.