लाडक्या बहिणींना विकत घेणार का?; काँग्रेसच्या महिला खासदाराचा शिंदे सरकारला थेट सवाल

Praniti Shinde on Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या महिला खासदाराचा शिंदे सरकारला थेट सवाल... लाडकी बहिण योजनेवरून त्यांनी शिंदे सरकारला प्रश्न विचारले आहेत. कांदा निर्यातीवरही त्यांनी भाष्य केलंय. तसंच सरकारच्या धोरणांवर प्रणिती शिंदे यांनी टीका केली आहे. वाचा सविस्तर...

लाडक्या बहिणींना विकत घेणार का?; काँग्रेसच्या महिला खासदाराचा शिंदे सरकारला थेट सवाल
प्रणिती शिंदे, खासदारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 1:56 PM

काही दिवसांआधी शिंदे सरकारने एक महिलांसाठी एक योजना जाहीर केली आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमाह 1 हजार 500 रूपये दिले जाणार आहेत. या योजनेवरून विरोधी पक्षाकडून टीका केली जाते. निवडणुकीआधी महिलांना लक्ष करण्यासाठी ही योजना आणल्याचं बोललं जातं. तर या निवडणुकीनंतरही योजना बंद होईल अशीही टीका विरोधी पक्षांकडून केली जाते. आताही काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेवरून शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. लाडक्या बहिणींना विकत घेणार का? असा थेट सवाल प्रणिती यांनी केला आहे.

शिंदे सरकारवर निशाणा

गुजरातमधील कांद्याची निर्यात होते. मात्र महाराष्ट्रातील केली नाही. सिंचनाची पाणीपट्टी दहा टक्क्याने वाढवली आहे त्याचा निषेध करते. नितीन गडकरी काल म्हणाले अनुदान मिळणार नाही. कारण सरकारचे सगळे पैसे लाडक्या बहिणीसाठी वापरले आहेत. कोणत्याही बहिणीला अनुदान मिळणार नाही. येणाऱ्या दोन महिन्यात सर्व योजना बंद होतील. केवळ तीन योजना चालू राहणार आहेत. आतापर्यंत निवडणुकीत टेबलाच्या खालून पैसे देत होते. आतावरून पाच हजार रुपये देत आहेत. त्यांचे मंत्री नितीन गडकरी म्हणाले की अनुदान बंद होणार आहे. सरकार दिवाळखोर झालं आहे. कारण सगळे पैसे खर्च झालेत. लाडक्या बहिणींना विकत घेणार का आम्हाला सुरक्षा हवी आहे, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

बदलापूर प्रकरणावर प्रतिक्रिया

बदलापूरमध्ये झालेल्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे देश हळहळला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. यावरून प्रणिती शिंदेंनी सरकारवर निशाणा साधलाय. भाजप बदलापूर घटनेतील भाजपचे दोन पदाधिकारी फरार आहेत. मात्र एका व्यक्तीचा एन्काऊंटर घडवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारला तोंड दाखवायची लायकी राहिली नाही, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.

आम्हाला विमानतळ नकोय विमान सेवा हवी आहे. आम्हाला विमानतळ पन्नास वर्षापासून आहे. मात्र आम्हाला विमानसेवा हवी आहे. मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विमानतळ उद्घाटनाला महायुतीचे 11 पैकी एकच आमदार उपस्थित होते. एक आमदार म्हणाला आम्हाला आमंत्रण मिळालं नाही. तर दुसरा म्हणाला मी दर्शनाला गेलोय. मोदीजी म्हणाले की यंत्रमाग कामगारांना आम्ही युनिफॉर्म शिवण्यासाठी देऊ. मात्र मोदीजी यंत्रमाग कामगार हे टॉवेल आणि नॅपकिन तयार करतात युनिफॉर्म नाही. देशाच्या पंतप्रधानांना एवढे देखील माहिती नाही ही शोकांतिका आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.