“लोकांना गरीब ठेवणारा पक्ष म्हणजे भाजप”; काँग्रेस नेत्याची भाजपवर सडकून टीका
या सरकारने तुमच्या खिशातून पैसे काढायचे आणि निवडणुकीत तुम्हालाच वाटायचे आहे हा फंडा भाजपने चालू केला आहे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. तर याचवेळी त्यांनी केंद्रावर आणि मोदी यांच्यावर टीका करताना नरेंद्र मोदी हा खरा बनिया आहे.
सोलापूर: केंद्र सरकार म्हणजे जुमलेबाजी सरकार असल्याचा आरोप भाजप सत्तेत आल्यापासून काँग्रेसकडून केला जात आहे. आजही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका करत भाजप म्हणजे खोटारडी व्यवस्था, लोकशाही मान्य नसलेला आणि लोकांना गरीब ठेवणारा पक्ष म्हणजे भाजप असल्याची टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. एका काळ्या टोपीवाल्याला राज्यपाल पदावर भाजपने बसवले होते. तर याच राज्यपालानी आंबेडकर, शिवराय, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला होता,
त्याच भाजपला आता तुम्ही सोडून आलात त्याबद्दल अशोक निंबर्गी यांचे स्वागत आहे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. नरेंद्र मोदी यांच्यावरहा त्यांनी निशाणा साधताना ते म्हणाले की, मी मोदींसारखा खोटारडा माणूस नाही.
कारण मोदींनी सांगितले होते की, सैनिकांचे ड्रेस सोलापुरात शिवतो, मात्र आता सरकारने सैनिकच ठेवले नाहीत त्यांचे खासगीकरण केले असल्याचा घणाघात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.
नाना पटोले यांनी सोलापूरचे महत्व अधोरेखित करतान सांगितले की, सोलापुरात हुतात्मे, महात्मे आणि क्रांतिवीर आहेत. त्याच प्रमाणे काही राजकीय नेतेही आहेत.
सोलापूरचे पूर्वीचे खासदार हे मोठ्या अंगठ्या घालून यायचे आणि लोकसभेत झोपत होते असा टोला त्यांनी भाजपचे माजी खासदार शरद बनसोडे यांना लगावला आहे.
भाजपमुळे सोलापूरकर हे मागील दहा वर्षात ते पन्नास वर्षे मागे गेले आहेत. त्यामुळे आता भाजपच्या विचारला माफ करण्याची वेळ नाही, त्यांच्यासाठी तुम्ही थांबाल तर तुम्ही संपून जाल असा घणाघात त्यांनी भाजपवर केला आहे.
यावेळी त्यांनी दंगलीवरूनही राज्यात चाललेल्या राजकारणावरुनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात मागील काही दिवसात 9 धार्मिक दंगली झाल्या आहेत. अकोल्यात 2 हजार पोलीस आहेत मात्र दंगल सुरु झाल्यावर तेथील पोलीस का गायब होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
ज्या ठिकाणी दंगल झाली त्या ठिकाणी दोन तास त्या ठिकाणी पोलीस नव्हते. त्यामुळे मी पोलीस महासंचालकांना विचारले की पोलीसांवर कोणाचा दबाव आहे.
तसेच मूळ प्रश्न बाजूला राहावेत म्हणून या दंगली घडवल्या जात आहेत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. देशात कृत्रिम महागाई आणली आहे.
या सरकारने तुमच्या खिशातून पैसे काढायचे आणि निवडणुकीत तुम्हालाच वाटायचे आहे हा फंडा भाजपने चालू केला आहे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. तर याचवेळी त्यांनी केंद्रावर आणि मोदी यांच्यावर टीका करताना नरेंद्र मोदी हा खरा बनिया आहे,
त्यांच्यामुळेच केंद्रातील सरकार हे बनिया वृत्तीचे असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसेच सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीवर बोलताना त्यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर सुशीलकुमार शिंदे पुन्हा एकदा लोकसभेला उमेदवार राहतील त्यामुळे तुम्ही त्यांना निवडून आणणार का? असा सवालही त्यांनी कार्यकर्त्यांना उपस्थि केला आहे. मला सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार निवडून आणायचे आहेत.
नाना पटोले यांनी सोलापूरसह माढा लोकसभेवरही त्यांनी दावा केला आहे. त्यामुळे इते कोणी भुट्टा येईल आणि काहीही बोलून जाईल हे खपवून घेतले जाणार नाही म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी त्यांनी हेही सांगितले की, लोकांची पसंती ही काँग्रेसलाच आहे, त्यामुळे भविष्यात येथे काँग्रेसचाच उमेदवार असणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.