पठ्ठ्याने स्वत:च्या रक्ताने काढलं देवेंद्र फडणवीसांचं चित्र, फोटो तुफान व्हायरल

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंना एका कलाकाराने आपल्या रक्तानं रेखाटलेलं चित्र पंढरपूरच्या दौऱ्यादरम्यान भेट म्हणून दिलं. फडणवीसांनीही या कलाकाराचं कौतुक केलं. त्यासोबतच एक प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला.

पठ्ठ्याने स्वत:च्या रक्ताने काढलं देवेंद्र फडणवीसांचं चित्र, फोटो तुफान व्हायरल
Piyush Hattigote Sketch Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 11:03 PM

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत आपली सर्व ताकद लावत असल्याचं दिसत आहे. राज्यातील मोठ्या नेत्यांच्या सभा संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहेत. सभेच्या ठिकाणीही उन्हाळा सुरू असताना मोठी गर्दी होतेय. कार्यकर्त्यांची निष्ठा आणि आपल्या नेत्यावरचं प्रेम हे यातून दिसून येतं. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये एक खास भेट मिळालीय.

देवेंद्र फडणवीस यांंना एका कलाकाराने आपल्या रक्तानं रेखाटलेलं चित्र पंढरपूरच्या दौऱ्यादरम्यान त्यांना भेट म्हणून दिलं. फडणवीसांनीही या कलाकाराचं कौतुक केलं. त्यासोबतच एक प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला. आपल्या (ट्विटर) एक्सवर त्यांनी फोटो शेयर केला. माझ चित्र रेखाटण्याऐवजी रक्तदान करा, असा सल्ला फडणवीसांनी दिला. पियुष शैलजा गिरीश हत्तीगोटे असं या कलाकाराचं नाव आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पंढरपूरचा पियुष शैलजा गिरीश हत्तीगोटे याने स्वत:च्या रक्ताने रेखाटलेले चित्र मला आज पंढरपूरच्या दौऱ्यादरम्यान भेट दिलं आहे. मी त्याचा मन:पूर्वक आभारी आहे. पियुष तू भेट दिलेले चित्र अतिशय उत्तम, यात वाद नाहीच. कला म्हणून मी त्याचा सन्मानच करतो. पण, माझी यानिमित्ताने एक विनंती सर्वांना आहे, तुमचे रक्त माझे चित्र काढण्यासाठी सांडण्यापेक्षा, मोठ्या प्रमाणात रक्तदान करा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अनेकांची आयुष्य वाचवण्याच्या कामी हातभार लागेल. आपले रक्त समाजासाठी अर्पित करणे, हीच आपली संस्कृती आहे आणि त्याच मार्गाने आपल्याला वाटचाल करायची असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच माझ्यावर दाखविलेल्या या प्रेमाबद्दल फडणवीस यांनी पियुषचे आभार मानले.

दरम्यान, सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीसंचा हा फोटो व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. फडणवीसांंचं फक्त चित्र नाहीतर ते आपल्या रक्ताने काढल्यामुळे पियुषचं कौतुकही केलं जातंय. फडणवीसांनीही हुरहुन्नरी कलाकाराच्या कलेचा मान ठेवला त्यासोबतच एक उत्तम सल्लाही दिला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.