धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईत उपचार, सोलापुरात चाहत्यानं घातलं सिद्धरामेश्वराला दंडवत
धनंजय मुंडे यांना शक्ती दे. बळ दे. त्यांना लवकर कामावर रुजू होऊ दे.

सोलापूर : युवा प्रतिष्ठानच्या वतीनं धनंजय मुंडे यांच्यासाठी सिद्धरामेश्वराला साकडं घालण्यात आलं. धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात भरती करण्यात आलं. मुंडे यांच्या आरोग्यासाठी सिद्धरामेश्वराला त्यांचा कार्यकर्ता दंडवत घालत होता. धनंजय मुंडे यांचे समर्थक सनी देवकते म्हणाले, मी युवा प्रतिष्ठान संस्थेचा सोलापूरचा अध्यक्ष आहे. काल नजरचुकीनं धनंजय मुंडे यांचा अपघात झाला. हा अपघात मोठा असल्याचं पाहताक्षणी समजलं. तीन-सव्वातीन वाजता कळलं की, अपघात झाला. हा अपघात घटनास्थळी गेल्यानंतर मोठा असल्याचं लक्षात आलं.
गाडीचा अक्षरशः चक्का चूर झाला. कार्यकर्त्यांना भीती बसली. अख्या महाराष्ट्रात धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. मुंडे यांच्या चांगल्या आरोग्यासाठी औरंगाबादला एक कार्यकर्ता भद्रा मारोतीला पायी जात होता. आज एक जण पुण्यातून शिर्डीला चालत जातोय, अशी माहिती सनी देवकते यांनी दिली.
धनंजय मुंडे यांच्यावर प्रेम करणारी अनेक जाती-धर्माची मुलं आहेत. धनंजय मुंडे या नावासाठी मुलं काहीही करायला तयार आहेत. धनंजय मुंडे यांचे आरोग्य लवकर सुधारावे यासाठी ग्रामदेवतेला दंडवत घातले. येणाऱ्या काळात धनंजय मुंडे यांना भरपूर शक्ती देवो. अशी ग्रामदेवतेला प्रार्थना केली.
धनंजय मुंडे यांना शक्ती दे. बळ दे. त्यांना लवकर कामावर रुजू होऊ दे. सोलापूरचंच नव्हे तर ते महाराष्ट्राचे नेते आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडं पाहतो, असंही सनी देवकते म्हणाले. येणाऱ्या काळात धनंजय मुंडे यांना चांगलं फळ मिळेल, अशी अपेक्षा करतो, असंही देवकते म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्या कारला काल अपघात झाला. ते किरळोक जखमी झाले आहेत. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परळीतील आझाद चौकात मध्यरात्री हा अपघात झाला. मुंडे यांनी स्वतः फेसबूकवर पोस्ट करून अपघाताची माहिती दिली. छातीला किरकोळ मार लागला असून, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याचं त्यांनी सांगितलंय.