Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indapur | शेतकऱ्याची चेष्टा करून, शांत असलेल्या शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ देऊ नका, का म्हणाले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असे

काही दिवसांपूर्वी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली मोठे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेती पंपाचा वीज पुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.

Indapur | शेतकऱ्याची चेष्टा करून, शांत असलेल्या शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ देऊ नका, का म्हणाले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असे
शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ देऊ नका -माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 7:47 PM

इंदापूर – राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम बंद करावी. शेती पंपांचा वीज पुरवठा तात्काळ चालू करावा. अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan patil) यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेती पंपाचा वीज पुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. या आंदोलन प्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी मोबाईलद्वारे आंदोलकांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. या आंदोलनप्रसंगी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन हर्षवर्धन पाटील व मान्यवरांना दिले होते. मात्र चार- पाच दिवस झाले तरी वीज पुरवठा पूर्ववत सुरु केलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्याची चेष्टा करू नका, शांत असलेल्या शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ देऊ नका, असा इशाराही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.

रस्ता रोको करत दिला होता इशारा

यापूर्वीही वीज तोडणी मोहिमेच्या विरोधात इंदापूरात भाजप आक्रमक झाले होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. आंदोलन दरम्यान पुणे -सोलापूर महामार्ग शेतकरी व भाजप कार्यकर्त्यांनी अडविला होता. या आआंदोलनाचा परिणाम वाहतुकीवर होत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्मण झाली होती. यानंतर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे मामा यांच्या निवासाबाहेरही भाजपने धरणे आंदोलन केले होते. त्यावेळीही सरकारने वीज तोडणीची मोहीम रद्द करावी अशी मागणी ककरण्यात आली होती.

एक नोटीस आली काय अन् जळफळाट सुरु, तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का? एकनाथ खडसेंचा फडणवीसांना सवाल

प्रवीण चव्हाण यांनी वकीलपत्राचा राजीनामा दिला, पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीला सोपवणार; दिलीप वळसे-पाटील यांची घोषणा

अर्ध सत्य हे पूर्ण खोटं असतं, ज्याच्या नावानं फडणवीसांनी सभागृहात पेनड्राईव्ह बाँब टाकला त्याच्यासोबतचाच फोटो मलिकांच्या मुलीनं ट्विटरवर टाकला

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.