पंढरपुरात वारकऱ्यांकडून फडणवीस दाम्पत्याचं स्वागत, दोघांनीही दिंडीत खेळली फुगडी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही.
पंढरपूर : पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वारकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाराय. त्यानिमित्त देवेंद्र आणि अमृता फडणवीस पंढरपुरात दाखल झाले.
टाळ मृदुंगाच्या गजरात स्वागत करण्यात आलं. ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत वारकऱ्यांकडून फडणवीस दाम्पत्याचं स्वागत करण्यात आलं. यावेळी फडणवीस दाम्पत्यानं वारकऱ्यांसोबत दिंडीत विठोबा तुकारामाचा गजर केला.फडणवीस दाम्पत्यानं टाळ वाजविलेत.
अमृता फडणवीस यांनी एका महिलेसोबत फुगडी खेळली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही एका वारकऱ्यासोबत फुगडी खेळली. थोड्या वेळानं अमृता फडणवीस यांनी एका मुलीसोबत फुगडी खेळली. कार्तिकी एकादशीनिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा होणार आहे.
अमृता फडणवीस यांना फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही. समाजसेविका अमृता फडणवीस या दोन-तीन जणींसोबत फुगडी खेळल्या. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नव्हता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही वारकऱ्यांसोबत फुगडीचा आनंद घेतला.