गौतमी पाटील हिने घेतले विठ्ठलाचे दर्शन, लग्नाच्या प्रस्तावावर स्पष्टच बोलली
बीडच्या गलांडे पाटील या तरुणाने गौतमी पाटील हिला जाहीर लग्नाची मागणी घातली. त्यावर बोलताना गौतमी पाटील म्हणाली. सध्या तरी लग्नाचा विचार नाही.
रवी लव्हेकर, प्रतिनिधी, पंढरपूर : नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमात तरुण राडा करतात. तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी असते. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त असतो. कार्यक्रमांच्या तारखा बूक असतात. या व्यस्त कार्यक्रमातून ती आज पंढरपुरात दिसली. यावेळी तिने विठ्ठल रुख्मिनीचे दर्शन घेतले. नृत्यांगना गौतमी पाटील हिने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले . श्री विठ्ठलाचा आशीर्वाद असाच राहावा असे मागणी घातल्याचं तीनं सांगितलं. यां
त्यावर काही बोलायचे नाही
नितेश राणे हे संजय राऊत यांना महाविकास आघाडीची गौतमी पाटील असं म्हणतात. यावर विचारला असता गौतमी पाटील हिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मला त्यावर काही बोलायचं नसल्याचं ती म्हणाली.
लग्नाचा सध्या विचार नाही
बीडच्या गलांडे पाटील या तरुणाने गौतमी पाटील हिला जाहीर लग्नाची मागणी घातली. त्यावर बोलताना गौतमी पाटील म्हणाली. सध्या तरी लग्नाचा विचार नाही. कोणीही काही बोललं तर कसं लक्ष देणार, असंही गौतमी पाटील हिने सांगितले.
घरी पुरुष असावा, असं तिला वाटते. कारण तिच्या आयुष्यात तिला भाऊ नव्हता. शिवाय वडीलही आईला सोडून गेले होते. त्यामुळे तिने असं मत व्यक्त केलं. आता ती लग्न केव्हा करणार, अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावर ती गोलमाल उत्तर देत होती.
बीडच्या गलांडे पाटील याने सोशल मीडियावर चक्क गौतमी पाटील हिला लग्नाची मागणी घातली. तू जशी आहेत, तशी स्वीकारायला मी तयार असल्याचं गलांडे पाटील याने म्हटलं. त्यामुळे त्याला गौतमी पाटील काय उत्तर देते, याची उत्सुकता होती. सध्या तरी लग्नाचा विचार नाही, असं म्हणून गौतमी पाटील हिने हा विषय संपवला.