कोरोनात व्यवसाय बंद पडला, पती दारुच्या आहारी गेला, पैशांसाठी पत्नीकडे करून लागला भलतीच मागणी

बहीण ही एका बँकेत नोकरी करते. तिच्याकडून पैसे घेऊ तो गेला. परंतु तिलाही पैसे परत दिले नाहीत. त्याला सतत पैसे देणे जमेना म्हणून तो मला मारहाण करू लागला.

कोरोनात व्यवसाय बंद पडला, पती दारुच्या आहारी गेला, पैशांसाठी पत्नीकडे करून लागला भलतीच मागणी
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 2:04 PM

सागर सुरवसे, प्रतिनिधी, सोलापूर : विवाहित महिला म्हणते, माझा विवाह नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील तरुणाशी झाला. लग्नानंतर चार वर्षे मला व्यवस्थित नांदवले. त्यानंतर पतीने श्रीरामपूर येथे शिर्डी रोडला एक हॉटेल आणि नंतर दुसरे हॉटेल चालवायला घेतले. तेव्हा भाऊ हॉटेलवर कामासाठी होते. परंतु त्यांचे पैसे पती देत नव्हता म्हणून ते तिथून निघून गेले. त्यानंतर पतीने मला पैशाच्या कारणावरून सतत त्रास दिला. कोरोनातील लॉकडाऊनमध्ये आम्हाला हॉटेल बंद करावे लागले. तेव्हापासून आम्हाला पैशाची खूप चणचण बसू लागली. त्यामुळे पती सतत माहेरून पैसे घेऊन ये असे म्हणून त्रास देऊ लागला.

पत्नीच्या बहिणीच्या पगारावर डोळा

बहीण ही एका बँकेत नोकरी करते. तिच्याकडून पैसे घेऊ तो गेला. परंतु तिलाही पैसे परत दिले नाहीत. त्याला सतत पैसे देणे जमेना म्हणून तो मला मारहाण करू लागला. शिव्याकाळ करणे आणि परिवाराला उद्ध्वस्त करून देणे अशी तो धमकी देऊ लागला. त्यानंतर मी माहेरी निघून आले होते, असे विवाहित महिलेचे म्हणणे आहे.

पैशासाठी पत्नीचा छळ

विवाहित महिला म्हणते, माझ्या भावाला पतीने नोटरी लिहून दिली. माझ्या मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळेल. त्यानंतर पतीसोबत मी सासरी गेले. मात्र त्यावेळेस आमच्यासोबत सावत्र मुलगा, दिर असे आम्ही सर्वजण पुणे येथे राहायला गेलो. पुण्यात राहत असताना पती आणि त्याचा मुलगा आणि दिर हे तिघेजण मिळून पैशाच्या कारणावरून छळ करू लागले.

हे सुद्धा वाचा

स्वतःला संपवण्याचा प्रयत्न

यातूनच 2022 मध्ये जीव संपवण्यासाठी मी एकाचवेळी १५ गोळ्या खाल्ल्या होत्या. परंतु मला पुण्यातील एका रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर उपचार घेतल्यानंतर तब्येत ठिक झाली. त्यानंतर माहेरी आले, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतरही पतीने पुन्हा मला गोड बोलून सासरी नेले. थोडे दिवस माझ्यासोबत चांगला वागला.

पत्नीला तिच्या बहिणीशी लग्न करून देण्याची मागणी

मात्र नंतर परत दारू पिऊन मित्रांना घेऊन घरी गोंधळ करून मला त्रास देऊ लागला. दिर, जाऊ, सावत्र मुलगा, सासू, सासरे आणि नणंद हे पैशाच्या कारणावरून त्रास देत होते. पती हा माझी बहिणीशी लग्न लावून दे आणि तिचा मिळणारा पगार मला दे असे म्हणून सतत टॉर्चर करीत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून बहिणीच्या घरी आले, असे विवाहितेने म्हटले आहे.

तुझ्या बहिणीचा मिळणारा पगार मला दे

तुझ्या बहिणीशी लग्न लावून दे आणि तिचा मिळणारा पगार मला दे, असे म्हणत सतत पत्नीला टॉर्चर करत आहे. ३२ वर्षाच्या एका विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासरे, नणंद आणि सावत्र मुलगा अशा आठ आरोपींविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. विवाहित ही सध्या करमाळा तालुक्यात एका गावात राहत आहे. तर तिची बहीण एका बँकेत नोकरीला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.