Dattatray Bharne | तुमची एवढी संपत्ती आभाळातून आलीय का? मी बोलायला लागलो तर तुमची वाचा बंद होईल, दत्तामामा भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना इशारा
19 वर्ष मंत्रिमंडळात असताना यांनी फक्त रुबाब केला, कसलेही विकास कामे केली नाहीत, गोकळी सारख्या भागात त्यांनी एकोणीस वर्षात काय काम केले असा माझा त्यांना सवाल आहे? कुठेतरी दोन-तीन लाख रुपयांचा विकास निधी आणायचा अन् दहा ते वीस वेळा नारळ फोडीत उद्घाटने करायची, निवडणूक आल्यानंतर लोकांची खोटी दिशाभूल करायची.
इंदापूर- तुमची एवढी संपत्ती आभाळातून आलीय का? 1995 अगोदर तुमची काय परिस्थिती होती, आख्या इंदापूर कराना माहितेय. मी जर बोलायला लागलो तर तुमची वाचा बंद होईल. माझ्याकडे तुमचा सगळा मसाला आहे, मात्र मला कुणावर वैयक्तिक पातळीवर बोलायचे नाही. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ( Minister of State Dattatraya Bharne)यांनी पाटील यांच्यावर केली सडकून टिका. इंदापूर तालुक्यातील गोखळी या गावी विविध विकास कामांच्या उद्घाटनावेळी भरणे बोलत होते. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Former Minister Harshvardhan Patil)यांनी भरणे हे तर कमिशन एजंट आहेत. असे म्हणत भरणेंवर गंभीर आरोप केला होता.त्याच या आरोपावर दत्तात्रय भरणे यांनी अत्यंत तिखट शब्दात ही प्रतिक्रिया दिली आहे.या प्रतिक्रियेमुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील या दोघा नेत्यांत जुंपलीअसून , इंदापूर(Indapur) तालुक्यातील राजकारणाचा वाद पोचला वैयक्तीक पातळीवर घसरलेला दिसून आला.
हर्षवर्धन पाटलांनी केले होते गंभीर आरोप
आठ मार्च रोजी झालेल्या रस्ता रोको आंदोलनात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर ती गंभीर आरोप केले होते भरणे हे कमिशन एजंट आहेत. त्यांच्या गाडीत ठेकेदार बसलेले असतात. तेराशे कोटी विकास निधी आणला असे म्हणता पण त्यातील तुमचा हिस्सा किती, तुमच्या घरचा वॉल कंपाऊंडचा हिस्सा किती? असे गंभीर आरोप यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरती केले होते. यावर ती उत्तर देताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही हर्षवर्धन पाटील यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांच्यावर टीका करताना पुढे म्हणाले,” इंदापूर तालुक्यातील सर्व जनता हि मला माझ्या शेतीपासून ओळखत आहेत, तालुक्यातील बारका मुलगा ही सांगेल कि मामा काय आहेत आणि पुढची माणसं (हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता) काय आहेत ते, जर तुम्ही जर खूप बोलायला लागला तर आम्ही ही काय….” असे म्हणत जरा वेळ शांत बसत तुम्ही समजून घ्या असेही ते म्हणाले .
हर्षवर्धन पाटील आता तुम्ही विश्रांती घ्या
हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता भरणे म्हणाले आता यांना काहीच काम नाही, यांना कुठली सत्ता नाही, इंदापूरच्या जनतेने यांना घरी बसवलेले आहे त्यामुळं आता यांनी विश्रांती घ्यावी, 19 वर्ष मंत्रिमंडळात असताना यांनी फक्त रुबाब केला, कसलेही विकास कामे केली नाहीत, गोकळी सारख्या भागात त्यांनी एकोणीस वर्षात काय काम केले असा माझा त्यांना सवाल आहे? कुठेतरी दोन-तीन लाख रुपयांचा विकास निधी आणायचा अन् दहा ते वीस वेळा नारळ फोडीत उद्घाटने करायची, निवडणूक आल्यानंतर लोकांची खोटी दिशाभूल करायची, जातीपातीचा विषारी प्रचार करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची एवढंच काम यांनी गेल्या 19 वर्षात केले आहे.
माझ्यावर खोटे आरोप केल्यावर मला खूप दुःख होते
मी रात्रंदिवस इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी नेहमी काम करीत आहे, गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात इंदापूर तालुक्यात विकास निधी खेचून आणला आहे, असे काम करत असताना जर माझ्यावर ती खोटे आरोप झाले तर माझ्या जिवाला खूप दुःख होते, झोपताना मला किती त्रास होतो हे माझ्या जीवालाच मला माहिती आहे अशे सांगत भरणे यावेळी भावनिक झाले होते, एवढे रात्रंदिवस काम करून सुद्धा पुढची लोक निष्क्रिय म्हणतात त्यामुळे त्यांनी 19 वर्षात काय केले हे सर्वांना माहीत असल्याचे ही यावेळी भरणे यांनी सांगितले.
पुण्यात हवा प्रदूषण निर्माण करणाऱ्या पीएमपी होणार हद्दपार ; पीएमपी प्रशासनाचा मोठा निर्णय