मुस्लिम समाजाची महाविकास आघाडीवर नाराजी; काँग्रेस नेत्याच्या विधानाने भुवया उंचावल्या

Husain Dalwai on Mahavikas Aghadi : काँग्रेसचे वरिष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी महाविकास आघाडीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मुस्लिम समाज महाविकास आघाडीवर नाराज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हुसेन दलवाई नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मुस्लिम समाजाची महाविकास आघाडीवर नाराजी; काँग्रेस नेत्याच्या विधानाने भुवया उंचावल्या
Follow us
| Updated on: Aug 18, 2024 | 10:46 AM

लोकसभेच्या 48 जागांपैकी एकही जागी उमेदवार दिला गेला नाही. त्यावेळेस मुसलमान समाजाची नाराजी होती. मोदी सरकार हटवण्यासाठी मुस्लिम समुदायाने 90% मतदान महाविकास आघाडीला केलं. मुस्लिम समुदायाला संधी न दिल्यामुळे महाविकास आघाडीवर समाजाची थोडी नाराजी आहे. आता आगामी विधानसभा निवडणूक ज्या ठिकाणी मुस्लिम समुदाय जास्त आहे. त्या ठिकाणी महाविकास आघाडीने मुस्लिम उमेदवार द्यावा, असं माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई म्हणालेत. हुसेन दलवाई सोलापुरात आहेत. तिथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

मुस्लिम उमेदवार द्या- हुसेन दलवाई

राज्यात ज्या विधानसभा मतदार संघात 50% अधिक मुसलमान समाजाची संख्या आहे. त्या ठिकाणी महाविकास आघाडीने मुस्लिम उमेदवार द्यावा. राज्यातील 32 जागांवर मुस्लिम समुदायाचे निर्णायक मतदान आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी यांच्याकडेदेखील जागा देण्याची मागणी आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात मुसलमान उमेदवार द्यावा, अशी मागणी हुसेन दलवाई यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीबाबत म्हणाले…

जम्मू आणि काश्मीरसोबत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अपेक्षित होती. मात्र राज्य सरकार घाबरलेलं आहे. त्यामुळे त्यांनी अधिकचा वेळ मागितला आहे. दिवाळीनंतर निवडणुका व्हाव्यात असे राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहेत. मात्र तेव्हा जरी निवडणुका झाल्या तरी महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र येणार आहे, असं हुसेन दलवाई म्हणाले.

एकनाथ शिंदेवर निशाणा

हुसेन दलवाई यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. जर समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर मुख्यमंत्र्यांना हटवलं पाहिजे, असं ते म्हणाले. रामगिरी महाराजांच्या व्यासपीठावर जाऊन मुख्यमंत्र्यानी वक्तव्य केलं मी त्याचा निषेध व्यक्त करतो. रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केले आहे त्यामुळे त्यांना अटक केली पाहिजे. जर समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर अश्या मुख्यमंत्र्यांना हटवलं पाहिजे. असला मुख्यमंत्री महाराष्ट्रात चालू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी डोकं चालवून काम करावं, असं दलवाई यांनी म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.