Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते आठ वर्षांनंतर जेलमधून परतले आणि बॅनरबाजी झाली, चर्चा तर होणारच

राष्ट्रवादीचे माजी आमदार जेलमध्ये गेले होते. तब्बल आठ वर्षानंतर ते परत आले. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते पुन्हा सक्रिय झाले.

ते आठ वर्षांनंतर जेलमधून परतले आणि बॅनरबाजी झाली, चर्चा तर होणारच
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 1:13 PM

माढा, सोलापूर : एखादा नेते आरोपाखाली जेलमध्ये गेला की कार्यकर्ते शांत होतात. पण, ते परत आल्यास पु्न्हा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो. असा काहीसा प्रकार नुकताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बाबतीत घडला. ते जेलमधून परत आल्यानंतर राष्ट्रवादीने (NCP) त्यांचे जल्लोषात स्वागत केले. नागपुरातील त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले. असाच काहीसा प्रकार मोहोळ येथे दिसून आला. राष्ट्रवादीचे माजी आमदार जेलमध्ये गेले होते. तब्बल आठ वर्षानंतर ते परत आले. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते पुन्हा सक्रिय झाले.

न्यायालयाने जामीन मंजूर केला

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात भ्रष्टाचार झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना तुरुंगात जाव लागलं. गैरव्यवहाराच्या आरोपाखाली ते गेली ८ वर्षे तुरुंगात होते. रमेश कदम यांना नुकताच न्यायालयाने जामीन मंजूर केला.

हे सुद्धा वाचा

अब आगए…

रमेश कदम यांचे समर्थक अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीपक पवार या समर्थकाने लावलेला डिजिटल बॅनर सर्वत्र चर्चेचा विषय ठरतो आहे. लगाओ अब कितना भी दम…! अब आगए रमेश कदम! आपल्या हक्काचा माणूस पुन्हा आलाय. असा आशय फलकावर लिहिण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांचा फोटोदेखील लावण्यात आलाय.

मोहोळमध्ये कदम समर्थन अॅक्टिव्ह होणार?

रमेश कदम हे माजी आमदार आहेत. त्यामुळे या भागात रमेश कदम यांना मानणारे बरेच कार्यकर्ते आहेत. पण, सेनापती जेलमध्ये गेल्यापासून ते शांत होते. आता आठ वर्षांनंतर रमेश कदम हे पुन्हा परत आले. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले. रमेश कदम यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या नावाची बॅनरबाजी करण्यात आली.

इकडे नागपुरात अनिल देशमुख अॅक्टिव्ह झाले आहेत. ते त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडत आहेत. तसेच रमेश कदम हे आता त्यांच्या भागात अॅक्टिव्ह होतात का, हे पाहावं लागेल. त्यांचे काही कार्यकर्ते जोमात आले आहेत.

वाडा तालुक्यात पाणीबाणी; पाण्यासाठी रात्रभर महिलांचा बोरिंगवर मुक्काम
वाडा तालुक्यात पाणीबाणी; पाण्यासाठी रात्रभर महिलांचा बोरिंगवर मुक्काम.
भीम जयंतीचा उत्साह शिगेला; नांदेडमध्ये भीम अनुयायांचा जल्लोष
भीम जयंतीचा उत्साह शिगेला; नांदेडमध्ये भीम अनुयायांचा जल्लोष.
खासदार सुप्रिया सुळेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन
खासदार सुप्रिया सुळेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन.
पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोक्सीला अटक?
पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोक्सीला अटक?.
सागरी सेतुवर लेजर लाइटींगने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृत
सागरी सेतुवर लेजर लाइटींगने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृत.
दानवे आणि खैरेंनी मिळून संभाजीनगरची वाट लावली, संदीपान भूमरेंची टीका
दानवे आणि खैरेंनी मिळून संभाजीनगरची वाट लावली, संदीपान भूमरेंची टीका.
जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच - अविनाश जाधव
जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच - अविनाश जाधव.
आमच्यात सगळं काही खुश खुश आहे; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
आमच्यात सगळं काही खुश खुश आहे; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण.
संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊतांवर खालच्या भाषेत टीका
संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊतांवर खालच्या भाषेत टीका.
शिवसेना उबठा गटाच्या सचिवपदी सुधीर साळवी
शिवसेना उबठा गटाच्या सचिवपदी सुधीर साळवी.