Ganesh Chaturthi 2023 | 20 वर्ष गणेशोत्सव काळात ‘या’ मुस्लीम सासू, सुना करत आहे साधना, पाहून तुम्हीही म्हणाल… SOCIAL :
मंगळवेढा तालुक्यातील माचनूर गावात ही महिला रहात आहे. बेगम पैगंबर शेख हे या महिलेचे नाव आहे. तर, त्यांच्या तहसीन सलमान शेख असे त्यांच्या सुनेचे नाव आहे. बेगम भाभी यांनी माचनूर गावात हिंदू-मुस्लिम सौहार्द राखण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
सोलापूर : 23 सप्टेंबर 2023 | महाराष्ट्रातील घराघरात श्री गणेशाचे आगमन झालेय. त्यापाठोपाठ ज्येष्ठा गौरीही सोन पावलांनी घरोघरी आल्या. गणेशोत्सव काळात सर्व जाती, धर्मीय गणपतीची मनोभावे सेवा करतात. या काळात विविध मंडळे सामाजिक कार्याला हातभार लावतात. तर, काही व्यक्ती मानवसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून आपले कार्य करत असतात. सोलापूरमध्येही एका मुस्लीम महिला गेली 20 वर्ष गणेशोत्सव काळात अतुलनीय कार्य करत आहे. वास्तविक मुस्लीम धर्मात मूर्ती पूजा निषिद्ध मानण्यात येते. पण, नातेवाईकांचा विरोध झुगारून ही महिला आपल्या सुनेला सोबत घेऊन आपले कार्य करत आहे.
बेगम शेख यांना 21 वर्षापूर्वी गौरीचे काही दोरे सापडले. त्यांनी ते दोरे एका जाणकाराला दाखविले. त्यांनी हे दोरे घरात ठेवा. काही दिवस बघा. चांगले वाटले तर ठेवा असे सांगितले. वर्षभर हे दोरे घरात ठेवले. काही नुकसान झाले नाही. उलट जे काही झाले ते चांगलेच झाले. आम्हाला जे दोरे सापडले त्यावरून आमचा विश्वास बसला. आम्ही त्याची पूजा केली. दुसऱ्या वर्षापासून आम्ही घरी गणपती आणि महालक्ष्मी गौरी आणायला सुरवात केली असे त्या सांगतात.
नात्यातील अनेकांनी आम्हाला या गोष्टीसाठी विरोध केला. मात्र, आम्ही त्याला जुमानले नाही. काही नातेवाईकांनी आपल्यात हे चालत नाही असे सांगितले. त्यांना आम्ही समजावून सांगितले. आम्ही हा एकच सण साजरा करत नाही तर दोन्ही धर्माचे सण साजरे करतो अशी माहिती त्यांनी दिली.
आमच्याकडे गौरी, गणपती येतात तेव्हा आम्ही आमच्या नातेवाईकांचे नंबर ब्लॉक करतो. जेव्हा हा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा घरातून काही विरोध झाला नाही. माझ्या सासू सासरे यांनी सण साजरा करायला परवानगी दिली. हा सण झाला की आम्ही पुन्हा नातेवाईकांचे नंबर सुरु करतो. आता आमची दुसरी पिढीदेखील हा सण अतिशय उत्साहाने साजरा करते. हिंदू परंपरेप्रमाणे आम्ही हा साजरा करतो असे बेगम शेख म्हणाल्या.
शेख कुटुंबीय गेली 20 वर्ष महागौरीची पूजा अत्यंत मनोभावाने करत आहेत. त्यांनी हा सण साजरा केल्यामुळे गावात काही वाईट वातावरण नाही. त्या मुस्लीम असल्या तरी त्या मुस्लीम आणि हिंदू दोन्ही धर्माचे सण साजरा करतात. हिंदू मुस्लीम ऐक्याचे हे उत्तम उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया माचनूर गावातील गावकऱ्यांनी दिलीय.