माढ्यात ‘त्या’ नेत्याचे शरद पवारांना आव्हान; म्हणाले, जनताच तुमची तुतारी…

Ranjit Naik Nimbalkar On Sharad Pawar and Loksabha Election 2024 : 'त्या' नेत्याचे शरद पवारांवर गंभीर आरोप अन् थेट आव्हान...; म्हणाले, जनताच तुतारी मोडणार... माढ्यात नेमकं काय घडतंय? राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना आव्हान देणारा नेता कोण आहे? वाचा सविस्तर...

माढ्यात 'त्या' नेत्याचे शरद पवारांना आव्हान; म्हणाले, जनताच तुमची तुतारी...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 11:07 AM

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. अशात काही मतदारसंघातील लढतीकडे माहाराष्ट्राचं लक्ष आहे. माढा लोकसभा मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष आहे. भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. अशात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान दिलं आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच माढ्यात भाजपचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

“तुतारी जनताच मोडणार”

माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेकडूनच तुमची तुतारी मोडली जाणार आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील कुटूबियांना भाजप पक्षाने विधानपरिषदेच्या सदस्य पदासह कारखान्याला मदत दिली. भाजपाने सर्व काही मोहितेंना सकारात्मक प्रतिसाद दिलेला असल्याने मोहिते-पाटील यांचा परिवार हाती तुतारी घेणार नाही. माढ्यात विजय हा भाजपचाच होणार आहे, असा विश्वास रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

पवारांवर आरोप

शरद पवारांनी 2009 सालच्या माढ्याच्या निवडणुकीत खोटी स्वप्ने दाखवली. जनतेची फसवणूक केली. आता जेव्हा तुतारी येईल. तेव्हा जनता ती मोडल्याशिवाय राहणार नाही. विजयसिंह मोहिते पाटील यांचं नेतृत्व मोठं होईल. म्हणून शरद पवारांनी कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेला केराची टोपली दाखवली, असा आरोप त्यांनी केला आहे.

शरद पवारांनी माढ्याचा विकास केला असता तर आता पर्यंत उमेदवार जाहीर करता आला असता. उमेदवारासाठी शोधा शोध करायची वेळ आली नसती.आयात उमेदवारी जरी शरद पवार गटाकडून आली तरी देखील निंबाळकर सज्जच असणार आहे, असं आव्हान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलं आहे.

“मोहिते पाटलांनी जरी विरोधात…”

मी कधीच राजकारणात शत्रुत्वाची भूमिका घेतली नाही. विजयसिंह मोहिते पाटलांची कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना व्हावी ही इच्छा होती. मात्र ती शासनाने बाजुला ठेवली. योजना पूर्ण करुन मोहिते पाटील कुटूंबाला धन्यवाद देणार आहे. माझ्या विरोधात उमेदवार द्यायला शरद पवारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत नेता मिळेना. आयात उमेदवार जरी आणला तरी मी निवडणुकीला सज्ज आहे, असंही रणजितसिंह निंबाळकर म्हणाले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.