सोलापूरः ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रा आज सोलापूरातून होत आहे. त्यामुळे साहजिकच सोलापूर जिल्ह्यातील सांगोल मतदार संघाचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्लाबोल चढविला. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर सुषमा अंधारे यांच्यासह ठाकरे गटाच्या जिल्ह्यातील नेत्यांनीही त्यांच्या बंडखोरीवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर टीका करताना बंडखोरी केलेल्या काळात त्यांचा प्रसिद्ध झालेला डायलॉग म्हणून त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
यावेळी त्यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर तुमच्याकडे बायकोला घ्यायाल दोनशे रुपये नव्हते तर मागील दोन वर्षात एक एकरमध्ये बंगला बांधण्याएवढे पैसा आला कुठून असा सवालही त्यांनी यावेळी केला. आलेला पैसा कुठून आला ते एकदा तुम्ही स्पष्टच करा असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील आपल्या भाषणात सांगताना म्हणतात की, आपण निष्कलंक माणूस आहे. साधी दोनश रुपयांची साडी घेणं बायकोला जमत नाही असंही ते जाहीर भाषणात सांगतात असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. त्यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांना काही प्रश्न विचारून जाहीर उत्तरं देण्याची विनंतीही केली आहे.
उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शहाजी बापू पाटील यांना त्यांनी पहिला प्रश्न विचारला की, तुम्ही जी वसंतदादा पाटील यांच्या नावानं सुतगिरणी स्थापन केली होती. त्या गिरणीच्या नावाने शेअर्स गोळा केले होते, त्याच सूतगिरणीच्या नावाने जमिनीही घेतली होती.
ते सगळं कुठं आहे असा थेट सवाल त्यांनी केल्यामुळे आता सोलापूरातील राजकारणात या सूतगिरणीवरून हे प्रकरण तापणार असल्याचे दिसून येत आहे.
ज्याप्रमाणे तुम्ही वसंतदादा पाटील यांच्या नावाने सूतगिरणी स्थापन केली होती, त्याच प्रमाणे तुम्ही पतंगराव कदम क्रेडिट सोसायटी स्थापन केली होती.
त्याही क्रेडिट सोसायटीचं काय झालं असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एवढचं नाही तर राधाकृष्ण दूध संघाचीही स्थापना तुम्हीच केली होती.
तो संघ तर आता कुठे आहे हेही एकदा तुम्ही स्पष्ट करा अशी जोरदार टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे. शहाजीबापू पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कुकूटपालनही तुम्ही केलं.
तरी कुठं आहे अशा एक पेक्षा अधिक सवाल सुषमा अंधारे यांनी शहाजी बापू पाटील यांना विचारले आहेत. त्यामुळे सुषमा अंधारे यांच्या या प्रश्नांची उत्तरं शहाजी बापू देणार का आणि या प्रश्नावरून सोलापूरचं राजकारण तापणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.