100 शकुनी मेल्यानंतर शरद पवार जन्माला…; गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका

Gopichand Padalkar Criticized on Sharad Pawar : गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. सोलापूरच्या माळशिरसमध्ये गोपीचंद पडळकर बोलत होते. यावेळी त्यांनी अरेतुरेची भाषा वापरली. ईव्हीएम मशीन आणि निवडणूक प्रक्रिया यावरही पडळकरांनी भाष्य केलं. वाचा...

100 शकुनी मेल्यानंतर शरद पवार जन्माला...; गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका
शरद पवार, गोपीचंद पडळकरImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 3:03 PM

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधल्या मारकडवाडी गावात आज महायुतीची सभा होत आहे. या सभेत जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. महाराष्ट्रातील धनगर समाज लोकशाही विरोधात आहे असे वातावरण तयार केले. 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे. या मतदारसंघात 100 गावं आहेत पण हेच गाव निवडले. कारण धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवाराने केले, असं गोपीचंद पडळकर म्हणालेत.

गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका

नरेंद्र मोदींचे ‘खरे’ चप्पल घालून बाहेर पडेपर्यंत राहुल गांधींचे खोटे गावभर फिरून येते. तसेच देवभाऊचे खरे बाहेर पडेपर्यंत शरद पवार यांचे खोटे गावभर फिरून येते. मारकडवाडीत पवार आले तेव्हापासून शरद पवारांची अक्कल आता संपली आहे. शरद पवारांना आवाहन आहे की, त्यांनी निवडणुका कश्या होतात. त्याबाबत आमदारांचे प्रशिक्षण घ्यावे आणि मैदानात यावे. ईव्हीएममध्ये घोळ कसा झाला ते सांगावे, असं पडळकरांनी म्हटलंय.

ईव्हीएमवर भाष्य

समोर आंदोलन करणाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही चुकीचा पायंडा पाडतायेत. हे सरंजामशाही मोहिते पाटील स्वतःला राजे मानतात. मी बारामतीत उभा होतो तेव्हा माझे डिपॉजिट जप्त झाले. मग जरा EVM घोळ असता तर मी पराभूत झालो असतो का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 हजार मतांनी पराभव झाला. मात्र त्यावेळी 72 हजार मतं बाद झाली होती. जो राहुलबाबा इथे येणार आहे. त्याच्या मामाच्या गावात पण EVM वर मतदान होतंय. जाऊन मामाच्या गावाला जाऊन बघ एकदा…. असं म्हणत पडळकरांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

जयंतराव पाटील हे सांगतात की, भाजपने 50 हजार मते आधीच सेट केले. त्यामुळे माझा विजय हा 61 हजार मतांनी झालाय पण प्रत्यक्षात ते 11 मतांनी जिंकले आहेत. शरद पवारांना मारकडवाडीचे आकर्षण का वाटतेय? कारण या देशातील जनता 2029 ला मोदींना पंतप्रधान करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना 5 वर्षे मुख्यमंत्री केले हे यांचे दुखणे आहे, असं पडळकर मारकडवाडीत बोलताना म्हणाले.

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.