खळं लुटणारा गावाकडे…; सदाभाऊ खोत यांची शरद पवार नाव न घेता टीका

Sadabhau Khot on Sharad Pawar : सदाभाऊ खोत यांनी नाव न घेता शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावरही सदाभाऊ खोत यांनी भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांची मिमिक्री खोत यांनी केली आहे. सदाभाऊ खोत काय म्हणाले? वाचा सविस्तर...

खळं लुटणारा गावाकडे...; सदाभाऊ खोत यांची शरद पवार नाव न घेता टीका
शरद पवार, सदाभाऊ खोत
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 1:24 PM

रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात शरद पवार यांच्या शारिरिक व्यंगावर टीका केली होती. या विधानाची जोरदार चर्चा झाली होती. त्यावेळी सदाभाऊ खोत यांना अजित पवारांनी देखील समज दिली होती. अशातच आता पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली आहे. खळं लुटणारा गावाकडे आला. त्यामुळे तुम्ही त्याला बरोबर गावाकडं आणलं. इंडियातील मोठा चोर राहुल गांधी पण येणार आहे, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार आणि राहुल गांधीवर नाव न घेता टीका केली आहे.

मारकडवाडीत आज महायुतीची सभा

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावात मागच्या काही दिवसांपासून राजकीय नेते भेट देत आहेत. या गावातील नागरिकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत पुन्हा बॅलेट पेपरवर मॉक पोलिंग मतदान घेण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांनी जमावबंदी लागू केल्याने हे मॉक पोलिंग झालं नाही. त्यानंतर शरद पवार यांनी या गावात जात सभा घेतली. राहुल गांधी या गावातून ईव्हीएमविरोधात रॅली काढणार आहेत. तर भाजप आणि महायुतीकडूनही आज या गावात सभा घेण्यात येत आहे. या सभेत सदाभाऊ खोत बोलत होते. तेव्हा त्यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

खोत यांची पवारांवर टीका

राजेश खन्ना सोबत राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी बॅलेट पेपरवर मतदान करतानाचा फोटो सभेत दाखवला. नवं तंत्रज्ञान राजीव गांधी यांनी आणले, टीव्ही, मोबाईल, EVM मशीन यांनी आणलं अमुक तमुक आम्ही आणलं. शरद पवारांनी आता शांत बसावं.पण यांना सत्ता गेल्यावर झोप लागत नाही. एखादा डाव पवारांनी टाकला तर पहेलवानाने नवा डाव टाकला असं म्हणतात. मात्र गेली 40 वर्षे यांनी डाव पहिले पण देवाभाऊ नावाचा वस्ताद मैदानात आला आहे. तेव्हा कळलं की हा पहेलवान नव्हता तर दुधी भोपळा होता. तुमची पोरगी 1 लाखाने निवडून आली. नातू रोहित पवार निवडून आले तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली होती का? असं सदाभाऊ खोत म्हणालेत.

राहुल गांधी यांचे एक स्वप्न आहे की माझं लग्न कधी होईल आणि लग्न झाल्यावर मी पंतप्रधान होणार आहे… राहुल गांधी गावात आल्यावर मारकडवाडीत दोन डबे मांडा, बॅलेट पेपरवर निवडून येऊ द्या. तो निवडून आला की त्याला पंतप्रधान करा, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राहुल गांधाी यांची मिमिक्री केली.

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.