मारकडवाडीत मतदान होणार की नाही? पोलिसांचा ताफा दाखल, ग्रामस्थ मंडपातून का उठले?, या घडीची अपडेट काय?

Markadwadi Village Ballot Paper Election : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावात आज सकाळपासून नाट्यमय घडामोडी घडत आहे. ईव्हीएम मशीनवर अविश्वास दाखवत गावकऱ्यांनी मारकडवाडीत मतदानाचा निर्णय घेतला होता. आज सकाळपासूनच त्यासाठी तयारी सुरू असतानाचा आता मोठी अपडेट समोर आली आहे.

मारकडवाडीत मतदान होणार की नाही? पोलिसांचा ताफा दाखल, ग्रामस्थ मंडपातून का उठले?, या घडीची अपडेट काय?
मरकडवाडीतील अपडेट काय
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 10:28 AM

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावात आज सकाळपासून नाट्यमय घडामोडी घडत आहे. ईव्हीएम मशीनवर अविश्वास दाखवत गावकऱ्यांनी मारकडवाडीत मतदानाचा निर्णय घेतला होता.ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मतदान प्रक्रिया राबवण्याची परवानगी मागितली होती. पण प्रशासनाने त्याला परवानगी नाकारली होती. जिल्हा प्रशासनाने तातडीने या गावात जमावबंदीचा आदेश लागू केला. 5 पेक्षा जास्त जणांनी एकत्र न येण्याचा निर्णय घेतला होता. तर पोलिसांचा मोठा ताफा या ठिकाण दाखल झाला. या गावाला सकाळपासून छावणीचे स्वरूप आले होते. आज सकाळपासूनच त्यासाठी तयारी सुरू असतानाचा आता मोठी अपडेट समोर आली आहे.

मतदान प्रक्रियेला स्थगिती

या मतदान प्रक्रियेपूर्वी पोलिसांनी गावकऱ्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी न होण्याचे आवाहन केले. पोलिसांनी याविषयीचे आवाहन केल्यानंतर ही गावकरी मागे हटले नाहीत. पण पोलिसांनी काही जणांना नोटीस बजावली. तर मतदान प्रक्रिया घेतल्यास गुन्हा दाखल करण्यात येतील असे सांगितले. त्यानंतर मतदान प्रक्रिया थांबवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करण्याचे ठरवले. त्यामुळे मरकडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान (Markadwadi Ballot Paper Voting) न घेण्याचे ठरवले. त्यांनी ही प्रक्रियाच थांबवली.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले उत्तम जानकर?

मतदान प्रक्रियेत प्रशासन आणि पोलिसांनी खोडा घातल्याचा आरोप उत्तम जानकर यांनी केला. लोकशाही मार्गाने गावकरी त्यांचा मतदानाचा हक्क बजावत होते. मंडपात मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. त्यांना मतदानाचा हक्क बजावायचा होता. पण पोलीसांनी गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याने अनेक गावकरी मंडपातून बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले. वयोवृद्ध आणि महिला मंडप सोडून गेल्याचे ते म्हणाले.

तसेच बॅलेट पेपरवर गावकऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावण्याचा प्रयत्न केल्यास ते हिसकवणार असल्याचे ते म्हणाले. या झटापटीमुळे गावकऱ्यांचे जो निष्पक्ष मतदानाचा उद्देश आहे. तो पूर्ण होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच झटापटीत कुणाला इजा होण्याची शक्यता आहे. गावातील विद्यार्थी आणि महिलांवर दहशत निर्माण होण्याची भीती पाहता मतदान प्रक्रिया होणार नसल्याचे त्यांनी सांगीतले. तर तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्याचे नियोजन असल्याचा इशारा त्यांनी दिला.

रणजीतसिंह मोहिते पाटील मास्टरमाईंड

दरम्यान मारकडवाडी येथील या नाट्यमय घडामोडींवर भाजपाचे नेते राम सातपुते यांनी चांगलेच तोंडसूख घेतले आहे. उत्तम जानकर हे तर या नाट्याचे केवळ प्यादे असल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व घडामोडींमागे रणजीतसिंह मोहिते पाटील हेच असल्याचा आरोप त्यांनी केला. मोहिते पाटील हे मास्टरमाईंड असल्याचा आरोप सातपुते यांनी केला. दरम्यान आज मारकडवाडी येथे होणारी चाचणी मतदान प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.