विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे दौरा करत आहेत. मराठवाडा दौरा त्यांचा सुरु आहे. आज सकाळी ते सोलापुरात होते. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात ऐरणीवर आला आहे. या आरक्षणाच्या प्रश्नावरही राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राममध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
मुंबई, ठाणे किंवा इतर शहरांमध्ये जसा विकास झालाय. जसे उड्डाणपूल झालेत. या गोष्टी का होतात? मूळच्या लोकांसाठी या गोष्टी होत नाहीत. तर बाहेरून अतिरिक्त येणाऱ्या लोकांसाठी हे केलं जात आहे. आपल्या राज्यातील सर्वाधिक पैसा हा बाहेरून आलेल्या लोकांवर खर्चा होतोय. ठाणे हा देशातील एकमेव असा जिव्हा आहे, जिथे एका जिल्ह्यात सात ते आठ महानगर पालिका आहेत. जर ठाण्यात इतक्या महापालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातील लोकांनी वाढवली? बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा इतका मोठा आहे की त्यांची व्यवस्था करण्यातच सरकारचा पैसा जातो आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. पण तरूणांना माहितीच नसतात, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी महाराष्ट्रातील नोकरीच्या जाहिरात निघतात. पण आपल्याकडे येत नाहीत. महाराष्ट्रातील पोरांना नोकरीबद्दल कळतच नाही. गेले अनेक वर्ष हे अशाचप्रकारे सरकार सुरु आहे. पाहिल्यादा भाजपाचा अयोध्येचा उमेदवार बोलला, 400 पार झाले की संविधान बदलणार… मग पहिल्यांदा नरेटिव्ह कोणी दिला? लाडका भाऊ, लाडकी बहीण यापेक्षा लाडका मतदार अशी योजना करा. स्पोर्टच्या बजेट मध्ये सर्वाधिक निधी गुजरातला आहे. या देशातील सर्व राज्याला समान निधी दिला पाहिजे. म्हणजे त्यामुळे अडचण येणार नाही, असं राज ठाकरे म्हणालेत.
राज ठाकरे अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिरात पोहोचले त्यांनी तिथे दर्शशन घेतलं. बऱ्याच वर्षानंतर राज ठाकरे स्वामी समर्थांच्या मंदिरात गेले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा आहे.