Video : ‘राष्ट्रवादी पुन्हा’वर दत्तात्रय भरणे यांनी धरला ठेका, ‘मामां’ना कार्यकर्त्यांनी घेतलं ‘डोक्या’वर!
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी आजही जल्लोष पाहायला मिळतोय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी ठेका धरला.
मुंबई : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharatratn Dr. Babasaheb Ambedkar) यांची 14 एप्रिलला जयंती साजरी झाली. गेले दोन वर्ष देशासह राज्यावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे जयंती साजरी करण्यासाठी काही मर्यादा आल्या, मात्र आता कोरोनाचे संकट कमी झाले असून, राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा मोठ्या धुमधडाक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Dr Bhimrao Ambedkar Birth Anniversary) राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी आजही जल्लोष पाहायला मिळतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी ठेका धरला. सोलापुरात डॉल्बी लावण्यात आला होता. तेव्हा त्यावर जिह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. डॉल्बीवर ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे गाणं लागलं होतं. त्यावर दत्तामामांनी एकच ठेका धरला.
राष्ट्रवादी पुन्हावर दत्तात्रय भरणेंचा ठेका
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी आजही जल्लोष पाहायला मिळतोय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी ठेका धरला. सोलापुरात डॉल्बी लावण्यात आला होता. तेव्हा त्यावर जिह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. डॉल्बीवर ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे गाणं लागलं होतं. त्यावर दत्तामामांनी एकच ठेका धरला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेतल्याचं पाहायला मिळालं.
‘राष्ट्रवादी पुन्हा’ गाण्यावर @bharanemamaNCP यांनी धरला ठेका pic.twitter.com/W069iNslVZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 17, 2022
सोलापुरात आज आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या मिरवणूक सोहळ्यात जवळपास 200 पेक्षा जास्त मंडळ सामील होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित विविध देखाव्याची मिरवणूक निघणार आहे. आंबेडकर जयंती निमित्त आज सोलापुरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याला पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित आहेत.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना तिकीट देण्यात आलं. भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा जयश्री जाधव यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये उत्साह पसरल्याचं पाहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय आज सोलापुरात आला दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी पुन्हा या गाण्यावर ठेका धरला.
संबंधित बातम्या