धनंजय मुंडे यांनी बूथ कॅप्चरिंग केलं…; महिला नेत्याचा गंभीर आरोप

NCP Leader Vidya Chavan on Dhananjay Munde : राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. निवडणुकीत बुथ कॅपचरिंग केल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे. विद्या चव्हाण नेमकं काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...

धनंजय मुंडे यांनी बूथ कॅप्चरिंग केलं...; महिला नेत्याचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे, नेते राष्ट्रवादीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 5:25 PM

नुकतंच लोकसभा निवडणूक पार पडली. यात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांचा विजय झाला. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पराभव स्विकारावा लागला. मात्र या निवडणुकीत बुथ कॅप्चरिंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी बूथ कॅप्चर केलं होतं, असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे. विद्या चव्हाण यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

विद्या चव्हाण यांचा आरोप काय?

आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी बूथ कॅप्चरिंग केलं होतं. माझ्यासोबत जे आता दोन जण आहेत ते याचे साक्षीदार आहेत. या मुद्द्याच्या तक्रारी सुद्धा केल्या आहेत. परंतु गृहखातं गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. आमच्यावर गुन्हा किंवा धोका निर्माण करायचं काम करू नये. धनंजय मुंडे यांच्या आदेशाने झालेलं गुन्हा आहे. निवडणूक आयोगाला जाब विचारला पाहिजे, असं विद्या चव्हाण म्हणाल्या.

आम्हाला काही फटका बसत नाही शरद पवार गट किती मजबूत आहे. हे लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आलं आहे. तेव्हा नवाब मलिकांनी त्यांची सुटका करून घेण्यासाठी असं बोलत असतील. तर ते त्यांचा प्रश्न आहे, असं म्हणत नवाब मलिक यांच्या विधानावर विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

महाजनांच्या विधानाला विद्या चव्हाणांचं विधान

मुस्लिम धर्मात 2 पेक्षा जास्त मुले आणि एकापेक्षा जास्त बायका असतील. तर लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये, असं विधान प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. यावर विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. हे सरकार अशा प्रकारे हिंदू मुस्लिम भेदभाव निर्माण करत आहे. जर ती महिला आहे बहीण आहे. तर मुस्लिम असल्यास काय फरक पडतो. मुस्लिम हे देखील याच देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे सर्वांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, असं विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.