कौटुंबिक वादाच्या तक्रारीत नाव घातल्याचा संशय, पोलीस पाटील यांच्या जीवावर बेतला

शनिवारी रात्री संशयित आरोपी रोहीत निवृत्ती पाटील याच्याशी आपलं भांडण सुरू आहे. रोहीतला समजावून सांगण्यासाठी सुरेश गुरव याने फोन करून पोलीस पाटील संदीप पाटील यांना बोलावून घेतले.

कौटुंबिक वादाच्या तक्रारीत नाव घातल्याचा संशय, पोलीस पाटील यांच्या जीवावर बेतला
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 9:29 PM

नंदकिशोर गावडे, प्रतिनिधी, चंदगड/कोल्हापूर : मार्च २०२३ मध्ये पोवाचीवाडी गावामध्ये रोहीत निवृत्ती पाटील आणि शांताराम आप्पा गावडा यांच्यात आजरा तालुक्यातील देवकांडगाव येथे मारामारी झाली होती. त्यावेळी रोहीत निवृत्ती पाटील यांच्यासह त्यांचे भाऊबंधकीतील लोकांच्या विरुध्द चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्या तक्रारीमध्ये पोलीस पाटील संदीप पाटील यांनी आमची नावे तक्रारीमध्ये घातली असा गैरसमज रोहीत निवृत्ती पाटील यांना झाला. त्यामुळे रोहीत पाटील तसेच त्यांचे नातेवाईक संदीप पाटील कुटुंबातील लोकांशी बोलत नव्हते.

संदीप पाटील यांच्यावर वार

शनिवारी रात्री संशयित आरोपी रोहीत निवृत्ती पाटील याच्याशी आपलं भांडण सुरू आहे. रोहीतला समजावून सांगण्यासाठी सुरेश गुरव याने फोन करून पोलीस पाटील संदीप पाटील यांना बोलावून घेतले. त्यानुसार पोलीस पाटील संदीप हे गुरव यांच्या देवचारंगी नावाच्या शेतात गेले. तिथं रोहित पाटील,निवृत्ती राजाराम पाटील, अरूण राजाराम पाटील आणि योगेश अरुण पाटील यांना समजावण्यासाठी गेले. जुन्या वादात पोलीस तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून त्यांनी संगनमत करून संदीप पाटील यांच्यावर हल्ला केला. यात संदीप यांच्या हातावर, मानेवर, डोकीत कोयता आणि खुरप्याने सपासप वार करून ठार मारले.‌

मृतकाच्या वडिलांची पोलिसांत तक्रार

या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.‌ संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संदीप याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. याबाबतची तक्रार मृतकाचे वडील ज्ञानदेव पाटील यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे करत आहेत.

तरच मृतदेह उचलणार

संदीप पाटील हे चंदगड तालुका पोलीस पाटील संघटनेचे सदस्य आहेत. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या संदीप यांच्यावर कोयत्याने वार करून खून केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. संदीप यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना जोपर्यंत अटक करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास चंदगड तालुका पोलीस पाटील संघटना आणि नातेवाईकांनी नकार दिला होता. मात्र मध्यस्थीनंतर आज संदीप पाटील यांच्यावर राहत्या गावी अंत्यविधी करण्यात आले.

संदीप पाटील असे मृतकाचे नाव

कौटुंबिक वादातील पोलीस तक्रारीत नाव घातल्याचा संदीप पाटील यांच्यावर राग होता. या रागातून पोवाचीवाडी येथील पोलीस पाटील संदीप पाटील यांचा कोयता, खुरप्याने डोक्यावर आणि मानेवर गंभीर वार करून ठार केले. ही दुर्दैवी घटना चंदगड तालुक्यातील पोवाचीवाडी येथील देवचारंगी नावाच्या शेतात शनिवारी रात्री घडली. संदीप ज्ञानदेव पाटील (वय वर्ष ४१) असे मृतक पोलीस पाटील यांचे नाव आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.