मनोज जरांगे यांच्यावर प्रकाश आंबेडकरांचा घणाघात, विधानसभा निवडणुकीत उमेदवार मागे घेण्यावर तोंडसुख, माघार नाट्यामुळे कुणाला लखलाभ?

Prakash Ambedkar attack on Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या तोंडावर मराठा उमेदवार उभे करून महायुतीला विशेषतः भाजपाला हिसका दाखवण्याची तयारी केली होती. पण वेळेवर त्यांनी माघार घेतली. या माघार नाट्यामुळे कुणाला लखलाभ होईल? यावर प्रकाश आंबेडकरांनी गंभीर आरोप केला आहे.

मनोज जरांगे यांच्यावर प्रकाश आंबेडकरांचा घणाघात, विधानसभा निवडणुकीत उमेदवार मागे घेण्यावर तोंडसुख, माघार नाट्यामुळे कुणाला लखलाभ?
आंबेडकरांची जरांगेंवर टीका
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 4:27 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या हंगामात मैदानात उतरण्याची आणि तितक्याच शिताफीनं माघार घेण्याची कसरत लीलया केली. त्यांनी अनेकांना चकमा दिला. राजकीय विश्लेषकांपासून अनेक पक्षातील नेत्यांना त्यांचा हा यूटर्न अचंबित करणारा होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करून महायुतीला विशेषतः भाजपाला हिसका दाखवण्याची तयारी केली होती. पण वेळेवर त्यांनी माघार घेतली. या माघार नाट्यामुळे कुणाला लखलाभ होईल? यावर प्रकाश आंबेडकरांनी गंभीर आरोप केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोठे आंदोलन केले. त्यांच्या उपोषणापुढे राज्य सरकारला अनेकदा नमतं घ्यावं लागल्याचे चित्र उभ्या देशानं पाहीलं. पण तरीही ओबीसीत सरसकट समावेशाची मागणी आणि सगेसोयऱ्याची मागणी पूर्ण झाली नाही. सरकारला हे आंदोलन अवघड जागेचं दुखणं झालं. लोकसभेत मराठा आंदोलनाचा मोठा फटका भाजपसह महायुतीला सहन करावा लागला. आता विधानसभेच्या तोंडावर जरांगे पाटील यांनी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिला. त्यासाठी उमेदवार उभं करण्याची घोषणा केली. अंतरवाली सराटीत इच्छुकांच्या रांगा लागल्या.

तर धास्तीने सर्व पक्षातील बड्या नेत्यांनी त्यांची भेट घेत सबुरीचा सल्ला दिला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जरांगे पाटील यांनी उमेदवार उभं न करण्याचे जाहीर केलं. या माघारी नाट्याची एकच चर्चा रंगली. कुणी ही भाजपासाठी हा अपशकुन असल्याचा दावा केला. तर कुणी जरांगे पाटील यांच्यावर दबाव असल्याचे म्हटले. आता प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

गरीब नाही तर श्रीमंत मराठ्यांसाठी खेळी

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे पाटील यांनी सगळ्यांना निवडणुकीसाठी उभे केले आणि अर्ज माघार घ्यायचा निर्णय घेतला. त्यातून 200 श्रीमंत मराठे निवडून येतील असे नियोजन झाले आणि दुर्दैवाने जरांगे त्यात सहभागी झाले, अशी घणाघाती टीका आंबेडकरांनी केली आहे. जरांगेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेऊन घरंदाज मराठ्यांपुढे सर्वसामान्य रयतेतील मराठ्यांचा बळी दिला, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे.

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.