रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या बुद्धीवर वयामुळे परिणाम झालाय; नाईक-निंबाळकरांचे राजकारण तापले; खासदार रणजितसिंहांची टीका

| Updated on: Jun 13, 2022 | 3:32 PM

भाजपा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका करताना त्यांनी सांगितले की, फलटण तालुक्यात आमदार आल्यास तालुक्यातील विकासाला चालना मिळणार आहे. तसेच रामराजे यांना पुढील निवडणुकीसाठी निश्चितच शुभेच्छा असल्याचे सांगत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या बुद्धीवर वयामुळे परिणाम झालाय; नाईक-निंबाळकरांचे राजकारण तापले; खासदार रणजितसिंहांची टीका
रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या बुद्धीवर वयामुळे परिणाम झालाय; नाईक-निंबाळकरांचे राजकारण तापले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सोलापूरः रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) हे सध्या सांगत आहेत की, रामराजे यांना मी तीन पिढ्यांपासून त्रास देत आहे. मात्र ते हे विसरत आहे की, माझं वय आहे 40 आणि त्यांचे वय आहे 78. माझ्या वयापेक्षा ते दुप्पट वयाचे आहेत. मग मी त्यांच्या तीन पिंढ्यांना कसा त्रास देऊ शकतो. वयामुळे त्यांच्या बुद्धीवर परिणाम झाला आहे अशी खरमरीत टीका माढ्याचे भाजपा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjit Singh Naik-Nimbalkar) यांनी रामराजेवर यांनी केली आहे. त्यांच्यावर टीका करताना रणजितसिंह यांनी त्यांच्या वयाचा प्रश्नही उपस्थित केला असल्याने सोलापूरच्या राजकारणात (Solapur Political Issue) खळबळ उडाली आहे. गंभीर टीका-

भाजपा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका करताना त्यांनी सांगितले की, फलटण तालुक्यात आमदार आल्यास तालुक्यातील विकासाला चालना मिळणार आहे. तसेच रामराजे यांना पुढील निवडणुकीसाठी निश्चितच शुभेच्छा असल्याचे सांगत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

अपक्ष आमदारांच्या मतदानावरच प्रश्नचिन्ह

राज्यसभेच्या उमेदवार निवडीवेळी झालेल्या मतदानामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मतदान झाल्यानंतर आणि कोल्हापूरचे संजय पवार या राज्यसभेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांच्या मतदानावरच त्यांनी प्रश्न उपस्थित करुन घोडेबाझार झाल्याची टीका केली.

संजय राऊतांना मतपत्रिका पाहायला मिळाल्या?

त्यामुळे अपक्ष आमदारांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. यावेळी भाजपा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मतदान गुप्त असते मग संजय राऊतांना मतपत्रिका पाहायला मिळाल्या असतील. त्यामुळे त्यांनी टीका केली असल्याचे सांगत अपक्ष आमदारांची संजय राऊतांनी बदनामी करणे योग्य नाही अशी टीकाही संजय राऊत यांच्यावर करण्यात आली. राऊत यांच्यावर टीका करत असताना आणि त्यांनी अपक्ष आमदारांवर घोडेबाजाराचा आरोप केल्याने अपक्षांना कोण मालक नसतो असेही त्यांनी सांगितले.

देशात भाजपच श्रेष्ठ

भाजपची ताकद सांगत त्यांनी या लोकसभा निवडणुकीचे उदाहरण देत ते म्हणाले की,कुणाच्यामध्ये किती बळ आहे. ते राज्यसभा निवडणुकीत दाखवून दिलं आहे, त्यामुळे देशात भाजपच श्रेष्ठ आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी आगामी विधानपरिषद निवडणुकीतदेखील भाजपच्या सर्वच जागा निवडून येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवारांनी केले आमच्या नेत्याचे कौतुक

रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका करत असताना त्यांनी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले त्याबद्दल मला चांगलेच वाटले असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

‘त्यांच्या’वर ईडीकडून कारवाई ही होणारच

भाजप विरोधातील जे नेते आहेत, त्यांच्याविरोधात ईडीकडून कारवाई केली जात असल्याने त्याबाबतही भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. त्यामुळे त्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे ते ईडीला घाबरतील. ईडीकडे तक्रार आल्यानंतर चौकशी ही होणारच आहे. मग ते कोण का असेना असं स्पष्ट मत त्यांनी ईडीविषयी मांडले आहे.