“उज्वला गॅस योजनेतून महिलांच्या डोळ्यात आज अश्रूंचा पाऊस”; काँग्रेसनं गॅस दरवाढीवरून नरेंद्र मोदी यांना घेरले
देशात महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचा डोंगर उभा राहिलेला असतानाच काँग्रेसने महागाईवरून नरेंद्र मोदी यांना घेरले आहे.
सोलापूरः गेल्या काही दिवसांपासून महागाई आणि बेरोजोगारीच्या प्रश्नावरून केंद्र सरकारवर विरोधी पक्षाकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने देशातील महिलावर्गातूनही नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात आहे. महागाईच्या कारणामुळेच सोलापूर काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलावर्गाला फसवले असल्याची टीका केली आहे.
संध्या सव्वालाखे यांनी ज्या प्रमाणे नरेंद्र मोदी यांच्यावर महााईच्या मुद्यावरून टीका केली आहे त्याच प्रकारे त्यांनी चित्रा वाघ यांच्यावरही टीका केली आहे.
देशातील गॅस सिलिंडच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा फटका देशातील सर्वसामान्य लोकांना बसला आहे. देशातील ही महागाई होण्याआधी आणि नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेत आणण्यासाठी देशातील महिलांनी सगळ्यात जास्त मतदान भाजपला केले होते.देशातील महिलावर्गामुळेच भाजपला सर्वाधिक मतं मिळाली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
संध्या सव्वालाखे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हणाल्या की, या दाढीवाल्या मोदी बाबांनी निवडणुकीत देशातील महिलांना फसवलं असल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
देशात ज्या ज्या राज्यात भाजप सत्तेत आहे त्याच राज्यामधून महिलांवर सर्वाधिक अत्याचार होत आहेत अशी गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी उज्ज्वला गॅस योजनेचाही दाखला दिला. नरेंद्र मोदी यानी सुरु केलेल्या उज्वला गॅस योजनेतून महिलांच्या डोळ्यातून आज अश्रुंचा पाऊस पडतो आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
तर नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना भाजपच्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ नेहमी आपण स्वतःचर्चेत राहण्यासाठीच त्या अभिनेत्री उर्फी जावेदवर टीका करत असतात. त्यामुळे उर्फी जावेदवर त्यांनी केलेली टीका ही प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचेही त्यांनी सांगितले.