शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेला सत्तेत घ्यायचं नाही, अशी पवारांची अट होती, माजी मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

Lok Sabha Election 2024 : शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सत्तेत घ्यायचं नाही, अशी शरद पवार यांची अट होती. त्यांनीच शिवसेना संपविण्याचे कटकारस्थान केल्याची घणाघाती टीका माजी मंत्र्यांनी केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह मित्रपक्ष 400 हून अधिक जागी निवडून येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेला सत्तेत घ्यायचं नाही, अशी पवारांची अट होती, माजी मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट
शिवसेना संपविण्याचे कारस्थान पवरांचेच
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 3:26 PM

2014 साली शरद पवार यांनी भाजपाला बाहेरुन पाठिंबा दिला होता.नुसता पाठिंबा दिला नव्हता तर दिल्लीत नरेंद्र मोदी, अमित शाह यांना भेटुन सगळी मंत्री पदाची यादी पण तयार केली होती. त्यावेळी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सत्तेत घ्यायचं नाही, अशी अट पवारांनी घातली होती, असा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माढ्यात केला. त्यांनी उद्धव ठाकरेंसह पवारांवर हल्लाबोल केला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह मित्रपक्ष 400 हून अधिक जागी निवडून येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्धव यांनी पवारांपासून दूर राहावे

त्यावेळी मोदी आणि शाह यांनी शिवसेनेला सोडून चालणार नसल्याचे शरद पवार यांना ठणकावल्याचे खोत म्हणाले. शिवसेना संपवण्याचे कटकारस्थान शरद पवारांनीच रचलेले आहे.शरद पवारांपासून उद्वव ठाकरेनी लांब रहावं.ही आग ले बेकार आहे, असा टोला त्यांनी हाणला. उद्धव ठाकरेनी फडणवीसांना नालायक म्हणण्यापेक्षा त्यांनी नवरी पळून गेल्यातला प्रकार दाखवू दिल्याची टीका त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

पवार हे अलिबाबा

शरद पवार शेतकऱ्यांना चुणा लावत आहेत. शरद पवारांना मोदीनी केलेली कामे दिसणार नाहीत.कारण पवार अलिबाबा आहेत. मोदीनी जनतेची कामे केली.पवारांनी टोळी तयार करुन बँका, साखर कारखाना, दूध संघ-सूतगिरण्या हडपण्याचे काम केले, असा आरोपही सदाभाऊंनी केला.

अजित पवारांना उशीरा कळले

राज्यपाल राजवट उठवण्यासाठी शरद पवारांनी अजित पवारांना पहाटे शपथ विधीला पाठवले होते.घरातले असून सुध्दा शरद पवार अजित पवार कळले नाहीत. आम्हांला ले अगोदर समजले होते, असा टोला त्यांनी हाणला. शरद पवारांचा इतिहास पाहिला तर वसंतदादा पाटील यांचेपासून ते आता पर्यंत ते पाठीत खंजीर खुपसत आले आहेत. त्यामुळे त्यांना खंजीर खुपश्या म्हटले तर चुकीचं ठरणार नाही.बारामतीत सुनेत्रा पवार निवडून येणार आहे. पवारांना साडेसातीचा फेरा लागलेला आहे. त्यांना हे या जन्मातच फेडावं लागणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील जनता स्वाभिमानी आहे.माझ्या सारख्या फकिराला 5 लाख मते दिली होती. निंबाळकराना अवघड जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.