शहाजी बापू पाटलांनी आता तमाशात कविता कराव्या, ठाकरे गटाने शिंदे गटाचा घेतला खरपूस समाचार

शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरात आहेत. त्यामुळे त्यांनी हिवाळी अधिवेशन चालू असतानाच त्यांनी गुवाहाटी दौऱ्याची आठवण सांगत नागपूरमध्येही त्यांनी त्यावर कविता केली.

शहाजी बापू पाटलांनी आता तमाशात कविता कराव्या, ठाकरे गटाने शिंदे गटाचा घेतला खरपूस समाचार
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 12:00 AM

सोलापूरः हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून ठाकरे आणि शिंदे गटातील वादामुळे प्रचंड चर्चेत आले आहे. सीमावादाबरोबरच राज्यातील अनेक समस्यांचा प्रश्न मांडत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपत आहे. आजही आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी गटावर अनेक प्रश्नांवरून टीका केल्यानंतर सत्ताधारी गटातील गुलाबराव पाटील, आमदार शहाजी बापू पाटील आणि आमदार संतोष बांगर यांच्याकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यावरूनच ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी आमदार गुलाबराव पाटील आणि शहाजी बापू पाटील यांचा समाचार घेतला आहे.

शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरात आहेत. त्यामुळे त्यांनी हिवाळी अधिवेशन चालू असतानाच त्यांनी गुवाहाटी दौऱ्याची आठवण सांगत नागपूरमध्येही त्यांनी त्यावर कविता केली. त्यावरून आता विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

यावेळी ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर टीका करताना ते आता फक्त चर्चेत राहण्यासाठी कविता वगैरे करतात. मात्र आता त्यांचा करिश्मा संपला असून त्यांनी आता फक्त तमाशामध्ये जाऊन कविता करायच्या अशी खोचक टीका ठाकरे गटाने त्यांच्यावर केली आहे.

मुंबई-सूरत-गुवाहाटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा दौरा करून आलेल्या चाळीस आमदारांवर गद्दारी केल्याची टीका ठाकरे गटाकडून वारंवार केली जाते.

गुवाहाटी दौऱ्यावर असताना आमदार शहाजी बापू पाटील याचे काय हॉटेल, काय डोंगार… हा डायलॉग प्रचंड गाजला होता. सोशल मीडियावरही त्या व्हायरल झाला होता.

त्यानंतर आज हिवाळी अधिवेशनात असतानाही शहाजी बापू पाटील यांनी त्या डायलॉगची आठवण करून दिली. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर त्यांनी आता तमाशात कविता करायच्या असा टोला त्यांना लगावला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.