शिंदे गट, भाजप, मनसे युती होणार? सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील म्हणतात,…
काय शिंदे, फडणवीस सरकार, काय सणासुदीचं तीन वर्षांनी दिवसं. काय ही महाराष्ट्रातली तमाम जनता...
सोलापूर : मुंबईत कालच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे एकत्र आले होते. भविष्यात मनसेबरोबर युती होईल का? यावर सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे मनसेबरोबर युती होण्याला काहीही अडचण नाही. कारण या तिन्ही पक्षांचा अजेंडा हा एकच आहे. पाया हा हिंदुत्वाचा आहे. त्यामुळं या तिन्ही पक्षांना एकत्र येण्यासाठी राजकारणाची कोणतीही अडचण वाटत नाही.
बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि आनंद दिघे साहेबांचे हिंदुत्वाविषयीचे विचार एकनाथ शिंदे पुढं नेत आहेत. आम्ही शिंदे साहेबांचे सैनिक आहोत. बाळासाहेबांचा विचार खेड्यापाड्यात पोहचवतील, अशा विश्वास आहे.
राजकीय दृष्ट्या कुणाचे फटाके फुटतील, यावर शहाजी बापू पाटील म्हणाले, दिवाळीनंतर अनेक लोकं बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करतील. टप्प्याटप्प्यानं तालुका पातळीवर पोहचवित आहोत. पायाभूत सुविधा गावागावात पोहचल्यावर आमच्या पक्षाकडं ओढा येईल. याचं कारण ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री काम करतात. त्यामुळं वाड्या-पाड्यातील लोकं शिंदे यांच्याकडं विश्वासानं पाहत आहेत, असंही शहाजी बापू पाटील म्हणाले.
मंत्रिमंडळाच्या विस्तारावर निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊ शकतात. पत्रकारांचे फोन आलेत. 1995 साली आमदार असलेली सभागृहात किती माणसं आहेत. तेवढे ज्येष्ठ आहात. तुम्ही महाराष्ट्र फिरला आहात. तुमच्यासारख्यांना संधी मिळाली तर बरं होईल. ही मत आहेत.
जनतेला वाटतं की, आपल्या आमदाराला मंत्रीपद मिळावं. त्यामुळं ज्यांना संधी मिळाली त्यांच्या भाग्यात होतं. ज्यांना संधी मिळत नाही त्यांनी जोमानं कामाला लागावं. कष्ट करणाऱ्याला भगवंत काहीतरी देऊन जात असतो, असं माझं मत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
काय शिंदे, फडणवीस सरकार, काय सणासुदीचं तीन वर्षांनी दिवसं. काय ही महाराष्ट्रातली तमाम जनता. आनंदानं फुललेली बहरलेली. काय या महाराष्ट्रात जिकडं, तिकडं आनंदी आनंद, अशी भावनाही शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केली.