महाराष्ट्राच्या राजकारणात आता गौतमी पाटील हिची ‘एन्ट्री’, ठाकरे गटाचा धडाकेबाज नेता पाहा नेमकं काय म्हणाला?

आपण कधीही राजकारणात जाणार नाही, असं गौतमी पाटीलने आधीच स्पष्ट केलंय. पण महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल? याचा काहीच भरोसा नाही. विशेष म्हणजे ठाकरे गटातील धडाकेबाज नेता गौतमी पाटीलच्या मदतीसाठी पुढे आलाय.

महाराष्ट्राच्या राजकारणात आता गौतमी पाटील हिची 'एन्ट्री', ठाकरे गटाचा धडाकेबाज नेता पाहा नेमकं काय म्हणाला?
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 8:58 PM

सोलापूर : डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिला आता संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ओळखते. कमी वेळात ती प्रसिद्धीच्या खूप उंच शिखरावर पोहोचली आहे. या गौतमी पाटीलसोबत मध्यंतरी एक अनपेक्षित प्रकार घडला. तिला नकळत काही समाजकंटकांनी कपडे बदलत असतानाचा तिचा व्हिडीओ बनवला. नंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या व्हिडीओ प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. पण याप्रकरणी पोलीस तपासात अजून तरी विशेष काही माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी जलद गतीने तपास करत संशयितांना अटकही केलीय.

या दोन्ही प्रकरणांवरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे गौतमीच्या नावाची या निमित्ताने राजकारणात एन्ट्री झालीय. अर्थात आपण कधीही राजकारणात जाणार नाही, असं गौतमीने आधीच स्पष्ट केलंय. पण महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल? याचा काहीच भरोसा नाही. गौतमी राजकारणात कधी येणार तर नाहीच. पण तिच्या नावावरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापू शकतं. कारण ठाकरे गटाच्या धडाकेबाज नेते शरद कोळी यांनी तिचं नाव घेत न्यायाची मागणी केली आहे.

राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. महापालिका निवडणुकींचं बिगूल कधीही वाजू शकतं. यामध्ये मुंबई महापालिकाचादेखील समावेश आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत.

हे सुद्धा वाचा

भाजप आणि शिवसेनेची सध्या मुंबईत आशीर्वाद यात्रा सुरु आहे. पण या आशीर्वाद यात्रेला दोन दिवसांपूर्वी गालबोट लागलं की काय, अशी परिस्थिती निर्माण झालीय. कारण या यात्रेतला शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांचा एक मॉर्फ केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल करण्यात आलाय. या प्रकरणावरुन संबंधितांना अटक झालीय. पण याच मुद्द्यावरुन शरद कोळी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

‘इज्जत फक्त तुमच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तीलाच आहे का?’

“शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे विधानसभा बंद पाडता. मग डान्सर गौतमी पाटील यांच्यासाठी अशी भूमिका का घेत नाही? शीतल म्हात्रे यांच्या व्यतिरिक्त उर्वरीत महिला या भगिनी नाहीत का? त्यांना इज्जत नाही का? इज्जत फक्त तुमच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तीलाच आहे का? याचा अर्थ तुम्ही पक्षापात करत आहात”, असा घणाघात ठाकरे गटाचे युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी केला.

“गौतमी पाटील यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओची एसआयटी चौकशी करा. बार्शीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. त्या आरोपींवर कारवाई करा, सोलापूरच्या तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष विरोधात फेसबुकवर रोज एक महिला अत्याचार केल्याची तक्रार करत आहे. त्याच्यावर कारवाई करा”, अशी मागणी शरद कोळी यांनी केली.

बार्शी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराचा मुद्द्यावरुन निशाणा

“शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे ही एकच महिला राज्यामध्ये आहे का? अन्य महिलांवरती अत्याचार होतात. त्यावरती राज्य सरकार का लक्ष देत नाही?”, असा सवाल करत शरद कोळी यांनी राज्य सरकारवर टीका केली. “बार्शी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. त्याची पोलिसांनी दखल न घेतल्याने आरोपींनी पोलिसांत का तक्रार दिली म्हणून मुलीची बोटं छाटली. त्याचीही चौकशी करा”, अशी देखील मागणी शरद कोळी यांनी केली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.