हाही टीझर दाखवा म्हणा एकदा, तर शिवसेनेची दुकान…, शंभूराज देसाईंचा टोला
2024 मध्ये शिंदे गटाचे 50 चे 51 आमदार होणार.
भूषण पाटील, Tv9 मराठी, प्रतिनिधी, कोल्हापूर : उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीनंतर कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, कोण म्हणतो दसरा मेळावा शिवाजी पार्कवरचा मोठा होणार. आम्ही म्हणतो. दसरा मेळावा बीकेसी पार्कवरचा मोठा होणार आहे. आम्ही कुणाबरोबर बरोबरी करणार नाही. आम्ही कोणाबरोबर तुलना करणार नाही. दूध का दूध पाणी का पाणी. चार दिवस राहिले. एक कॅमेरा शिवाजी पार्कवर ठेवा. दुसरा कॅमेरा बीकेसीवर ठेवा. फरक डोळ्यानं बघा.
आमचा एकही आमदार अरेरावीनं बोलतं नाही. आतताईपणानं आम्ही बोलत नाही. आम्ही सर्व गोष्टीचं भान ठेवूनचं बोलत असतो. त्यामुळं आमच्या कुठल्याही आमदाराला आत्मक्लेश करण्याची वेळ आली नाही. आणि अशी वेळ आमच्यावर येणारही नाही. आमचा एकही नेता आतताईनं बोलत नाही. शंभूराज देसाई यांनी अजित दादा यांना टोला लगावला.
… तर नाराजी दूर करू
माझी नियुक्ती झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीचं मी ठाणे जिल्ह्याचा दौरा केला. चार तारखेलाही ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली परिसरात आहे. सर्व लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी मला पालकमंत्री म्हणून विश्वासानं जबाबदारी दिली आहे.
सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी पालकमंत्री उपलब्ध नाही, असं होणार नाही. मनसेच्या आमदाराची नाराजी असेल, तर ती नाराजी दूर करणार असल्याचं आश्वासन शंभूराज देसाई यांनी दिलं.
2024 मध्ये शिंदे गटाचे 50 चे 51 आमदार होणार. पण 49 होणार नाही, येवढा आम्हाला विश्वास आहे, असं देसाई यांनी स्पष्टपणे सांगितलं.
…तर शिवसेनेचं दुकान बंद करेन
वंदनीय बाळासाहेब ठाकरे हेसुद्धा म्हटले होते. शिवसेना माझा पक्ष काँग्रेसबरोबर जाऊ देणार नाही. तशी वेळ आली, तर शिवसेनेचं दुकान बंद करीन. हाही टीझर दाखवा म्हणावं त्यांना एकदा. हे साहेबांचं वक्तव्य आहे, याची आठवण शंभूराज देसाई यांनी करून दिली.
अडीच वर्षांपूर्वी अनुकरण केलं असतं, तर ही वेळ आली नसती. शिवसेनेचं नुकसान आणि शिवसेना ही काँग्रेस,राष्ट्रवादीबरोबर फरफटत जाणं हे प्रमुख कारण शिवसेनेचं ठाकरे गट सोडण्यामागे आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली युती ही पुनरुज्जीवित केली.